आजकाल ऑनलाइन खरेदीला लोकांची पसंती मिळतांना दिसत आहे. होम डिलिव्हरी आणि भरपूर पर्याय यामुळे ऑनलाइन खरेदीचे चलन वाढतच चालले आहे. कोणतीही वस्तू पॅकिंग करून डिलिव्हरी करण्यासाठी कंपन्या कार्डबोर्ड चा वापर करत असतात.त्यामुळे वस्तू पॅकेजिंगसाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कार्डबोर्ड ची मागणी असते. या वाढत्या मागणीमुळे कार्डबोर्ड बिजनेसला चालना मिळत आहे , त्याचबरोबर या बिजनेसची देखील डिमांड वाढत आहे.
कार्डबोर्ड व्यवसायाची मागणी वर्षभर एकसारखी असते. या व्यवसायात मंदीच्या समस्येला खूप कमी सामोरे जावे लागू शकते. आपण या व्यवसायाची सुरुवात करून आरामाने महिन्यात लाखों रुपये कमावू शकतो. जर आपण कार्डबोर्ड निर्मितीच्या व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर या काही गोष्टी जाणून घ्या
कार्डबोर्ड व्यवसायात माल गोदामासाठी मुबलक आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जागेची आवश्यकता असते. जेणेकरून सामान आणण्यात आणि नेण्यात त्रास होणार नाही. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल ची आवश्यकता असते. यामध्ये क्राफ्ट पेपर रॉ मटेरियल म्हणून गरजेचा असतो. क्राफ्ट पेपर बाजारात 40 ते 50 रुपये प्रति किलो ने मिळतात. त्याचबरोबर क्राफ्ट पेपर च्या गुणवत्तेवर बॉक्सची गुणवत्ता अवलंबून असते , जितका चांगला क्राफ्ट पेपर असेल तितका चांगला बॉक्स बनू शकतो.
हे हि वाचा : 10 हजार रुपयात सुरु करा हा बिझनेस, कमी गुंतवणूकीत मिळेल जास्त फायदा
या व्यवसायासाठी महत्वाची गोष्ट म्हणजेच प्लांट. त्याशिवाय हा व्यवसाय अपूर्ण आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या मशिनी ह्या महाग असतात. यामध्ये SemiAutomatic Machine आणि FullyAutomatic Machine अश्या २ प्रकारच्या मशीन असतात. या दोन्ही मधील फरक म्हणजे आकार आणी इन्व्हेस्टमेंट. जर आपल्याला छोट्या लेव्हल हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही SemiAutomatic Machine मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. यासाठी तुम्हाला जवळपास 20 लाख एवढा खर्च येऊ शकतो. तर FullyAutomatic या मशीनसाठी 50 लाख रुपयां पर्यंत खर्च येऊ शकतो. कार्डबोर्ड व्यवसायाची मागणी वर्षभर असल्याने या व्यवसाययामध्ये नफा देखील खूप चांगला आहे.
हा व्यवसाय सुरु करून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कमाई करू शकतात. तुम्हाला कार्डबोर्ड व्यवसायासाठी लोकल मार्केट तसेच ई- मार्केट हा पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतो