गांधीनगर : गुजरातमध्ये आज मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचं नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. सर्व मंत्र्यांचा शपथविधी आज होईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवीन मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, तर अनेक जुन्या चेहऱ्यांना वगळलं गेलं आहे.
विशेष म्हणजे गुरुवारी, गुजरातमध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापनेच्या एक दिवस आधी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 मंत्र्यांचा समावेश होता. आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि तेवढेच राज्यमंत्री (एमओएस) आहेत. तर एकुण 25 मंत्री घेणार शपथ घेणार आहे, यात दिग्गज क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा सुद्धा मंत्री होणार असल्याचं समोर आलंय
किती नवीन मंत्री जोडले जाऊ शकतात? :
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही जुने चेहरे पुन्हा सामील होऊ शकतात. एकूण 16 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं वृत्त आहे. गुजरात मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 27 मंत्री असू शकतात, परंतु आज फक्त 16 जणांचा शपथविधी होणार आहे, ज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा गुरुवारी संध्याकाळी गांधीनगरमध्ये आले आणि त्यांनी मुख्यमंत्री पटेल आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेण्यात आली.
संपूर्ण मंत्रिमंडळ का बदललं जात आहे? :
असं मानलं जातं की गुजरातमधील जनता मुख्यमंत्र्यांवर खूश आहे, परंतु मंत्र्यांचा ग्राउंड रिपोर्ट चांगला नाही. दुसरं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. भाजपा काही दिग्गजांना परत आणण्याची तयारी करत आहे. याव्यतिरिक्त, काढून टाकण्यात आलेल्या मंत्र्यांना वरिष्ठ पदं दिली जातील. गुजरात विधानसभेत एकूण 182 सदस्य आहेत. यापैकी 27 मंत्र्यांचा, म्हणजेच एकूण 15 टक्के, समावेश असू शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला, गुजरात सरकारमधील राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांची केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या जागी गुजरात भाजपा अध्यक्षपदाची नियुक्ती केली. 12 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
पंतप्रधान मोदींसोबत एक महत्त्वाची बैठक :
अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री, प्रदेश पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांसह गुजरात भाजपा नेतृत्वासोबत एक प्रदीर्घ बैठक घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक भूमिकांमध्ये नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यावर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींना पदभार स्वीकारणाऱ्या सर्व नवीन चेहऱ्यांनी गुजरातच्या लोकांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या भूमिका स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात अशी इच्छा आहे.