मुंबई : पुढील टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका 2026 मध्ये संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या मेगा स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होतील, त्यापैकी काही संघ 2024 च्या टी-20 विश्वचषकातून निश्चित झाले होते, तर उर्वरित संघांनी पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केले होते. पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता 2025 मधून तीन संघांची नावं जाहीर होणार होती, ज्यात 15 ऑक्टोबर रोजी नेपाळ आणि ओमाननं त्यांचं स्थान निश्चित केलं होतं, ज्यामुळं एकूण संघांची संख्या 19 झाली. आता, युएईनंही या मेगा स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केलं आहे, यासह 2026 च्या टी-20 विश्वचषकात सहभागी होणारे सर्व 20 संघ ठरले आहेत.
युएईनं केलं आपलं स्थान निश्चित :
16 ऑक्टोबर रोजी, पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता 2025 मध्ये अल-अमीरात क्रिकेट मैदानावर युएई आणि जपान यांच्यातील सुपर सिक्स सामना खेळवण्यात आला. या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर, युएई संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जपानला 20 षटकांत 116 धावांवर रोखलं. युएईच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, अलिशान शरफू आणि कर्णधार मोहम्मद वसीम यांनी शानदार सुरुवात केली, पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. यासह, युएई संघानं 12.1 षटकांत 2 विकेट गमावून लक्ष्य गाठलं आणि 2026 च्या टी-20 विश्वचषकात आपलं स्थान निश्चित केलं.
The 20 teams that will feature at next year’s Men’s #T20WorldCup have now been confirmed 🏆
More 👉 https://t.co/KdYn1GwAHz pic.twitter.com/97JMzgJ2SY
— ICC (@ICC) October 17, 2025
2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी सर्व 20 संघ :
भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, यूएसए, वेस्ट इंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान, यूएई.
हे हि वाचा : 10 विकेटनं दणदणीत सामना जिंकत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये
इटली पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी :
विशेष म्हणजे फुटबॉलप्रीय असलेल्या इटलीनं 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी देखील पात्रता मिळवली आहे. दरम्यान, नामिबिया आणि कॅनडानंही दमदार कामगिरी करत विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.