Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • Diwali Gold 2025 : गेल्या 15 दिवसात सोन्याच्या भावात 11 हजार रुपयांची वाढ, अजून किंमत वाढण्याची शक्यता
बिजनेस

Diwali Gold 2025 : गेल्या 15 दिवसात सोन्याच्या भावात 11 हजार रुपयांची वाढ, अजून किंमत वाढण्याची शक्यता

ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागील पंधरा दिवसांपासून सोन्याच्या दारात 11 हजार 100 रुपयांची वाढ झाली असु चांदी प्रति किलो 11 हजारांनी महागली आहे. सोन्याला एवढा भाव का आला यामागे अनेक कारणे आहेत.

सोन्याच्या वाढत्या दरामुळे सध्या ग्राहकांमध्ये नाराजी आहे. आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा 1 लाख 27 हजार 970 रुपये  चांदी किलोमागे 1 लाख 56 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे. महिन्याभरापूर्वी  हेच भाव 1 लाख 10 हजार 220 होते. आणि आठवडाभरापूर्वी म्हणजेच 13 ऑक्टोबरला सोन्याचे भाव 1 लाख 24 हजार 520 रुपये होते. त्यानुसार 15 दिवसांत तब्ब 11 हजारांनी वाढ झाली आहे.

सोन्याचे भाव वाढलेले असले तरी बाजारपेठांमध्ये ज्वेलरी शॉप मध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीमध्ये साडेतीन मुहूर्तावर सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. तर बरेच जण सोने खरेदी हे गुंतवणुकीच्या माध्यमातून सोने खरेदीला प्राधान्य देतात. तसेच यंदाच्या दिवाळी पाडव्याला सराफा बाजारात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

हे हि वाचाधनत्रयोदशीनिमित्त ऑटो मार्केट चमकलं! मारुती-सुझुकीच्या 50000 हून अधिक कार विकल्या तर ह्युंदाईच्या विक्रीतही 20% वाढ

दसरा म्हणजेच 2 ऑक्टोबरला देखील सोन्याचे भाव प्रचंड वाढले होते. त्याचवेळी तज्ज्ञांनी सांगितले होते कि, दिवाळीत सोन्याच्या भावात प्रचंड वाढ होणार आहे. त्याचवेळी बऱ्याच जणांनी सोने बुक करून ठेवले होते. जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. सोन्याच्या दरवाढीमुळे सीमाशुल्कात देखील प्रचंड वाढ झाली आहे. दसऱ्यापासून आतापर्यंत सोनं 10 हजारांहून अधिक रुपयांनी महाग झालं आहे आणि पुढील काळातही दर आणखी वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. लग्नसराई, सण-उत्सव आणि गुंतवणुकीच्या पारंपरिक विश्वासामुळे ग्राहक पुन्हा सोन्याकडे पुन्हा वळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lok Shevay (@lokshevay)

जाणून घ्या गेल्या वर्षांपासूनचे सोन्याचे भाव

07 Oct – 2024 – 88 हजार रु प्रति किलो.

1 Jan – 2025 – 99 हजार 500 रु प्रति किलो.

1 March 2025 – 1 लाख 01 हजार रु प्रति किलो.

1 Jun 2025 – 1लाख 10 हजार रु प्रति किलो.

1 Sept 2025 – 1 लाख 40 हजार रु प्रति किलो.

18 oct 2025 –  1 लाख 68 हजार रुपये प्रति किलो

20 oct 2025- 1 लाख 56 हजार 400 रुपये प्रति किलो

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts