5 Best Web Series ON OTT Platform : यंदा दिवाळी नंतर जोडून शनिवार रविवार आल्याने लॉंग विकेंड आला आहे. या लॉंग विकेंड ला तुम्ही कुटुंबीयांसोबत चित्रपटांचा आस्वाद घेऊ इच्छित असाल तर जाणून घ्या सध्या OTT platform कोणकोणत्या लेटेस्ट चित्रपटांची मेजवानी सुरु आहे.
सध्या OTT platform वर लेटेस्ट चित्रपट आणि वेब सिरीस ट्रेंडिंगवर आहे. यंदाच्या दिवाळीतील विकेंड मजेदार घालवण्यासाठी सिरीज मॅरेथॉन लोकप्रिय पर्याय आहे. यासाठी नेटफ्लिक्स वर सध्या टॉप 5 चित्रपट आणि सिरीस गाजत आहे. या टॉप 5 वेब सिरीज आणि चित्रपटात अजय देवगण पासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केलेली वेब सिरीज देखील आहे. पाहुयात या टॉप 5 चित्रपट आणि वेब सिरीज ची स्पेशल लिस्ट, ज्यामुळे तुमचा विकेंड कुटुंबासोबत आनंदायी आणि मनोरंजनमय जाऊ शकतो.
द बॅड्स ऑफ बॉलीवूड :
यंदाच्या लॉन्ग विकेंड मध्ये शाहरुख खानच्या मुलाने म्हणजेच आर्यन खान याने दिग्दर्शित केलेली वेब सिरीस फर्स्ट अँड परफेक्ट चॉईस ठरत आहे. या सिरीजमध्ये बॉलीवूडचे ‘डार्क सिक्रेट्स’ विनोदी पद्धतीने दाखवले आहे. या वेब सिरीज मध्ये राघव जुयाल, लक्ष्य लालवानी, आन्या सिंह, साहेर बाम्बा, मोना सिंह, बॉबी देओल, गौतमी कपूर आणि मनोज पाहवा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत तर सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांसारख्या सुपरस्टार्सही यात कॅमिओ (Cameo) करताना दिसत आहे.
धडक २ :
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा रोमॅंटिक थ्रिलर चित्रपट सध्या नेटफ्लिक्स वर हवा करत आहे. हा चित्रपट प्रेम, भावना आणि गुन्हेगारीच्या थराराचा संगम असून चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास मदत करतो. या चित्रपटात तुम्हाला एक प्रेमकथा, तगडी केमिस्ट्री आणि अनपेक्षित ट्विस्ट्स अनुभवायला मिळतील. या चित्रपटातील क्राईम सीन्स आणि कथानकातील वेगवान घडामोडीमुळे हा चित्रपट ‘वीकेंड बिंज वॉच’साठी परफेक्ट ठरतो.
This time love won’t hold back! ❤️#Dhadak2 trailer out tomorrow.
Releasing in cinemas on 1st August. pic.twitter.com/F1TdlATPSh
— Dharma Productions (@DharmaMovies) July 10, 2025
ॲलिस इन बॉर्डरलाईंड :
ही एक थ्रिलर ड्रामा वेब सीरिज आहे. सध्या हि वेब सिरीज भारतात नेटफ्लिक्सवर प्रचंड चर्चेत आहे. या सिरीज मध्ये ॲक्शन (Action) आणि थ्रिलरचा जबरदस्त अनुभव बघायला मिळतो. या वीकेंडला घरात बसून सिरीज मॅरेथॉन करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन रिलीज झाले आहे. हि वेब सिरीज तुम्ही विकेंडला पाहू शकतात. आणि मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात.
हे हि वाचा : आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना यांच्या थमा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती ?
सन ऑफ सरदार २ :
अभिनेता अजय देवगण यांचा सन ऑफ सरदार 2 हा कॉमेडी चित्रपट दिवाळी वीकेंडला कुटुंबासोबत पाहण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर, संजय मिश्रा, रवी किशन, दीपक डोबरियाल, नीरू बाजवा आणि कुब्रा सैत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट विजय कुमार अरोरा यांनी दिग्दर्शित केला असून संपुर्ण चित्रपटात प्रत्येक सिन मध्ये तुम्हाला विनोदी डॉस मिळेल. आणि तुमचा सिरीज मॅरेथॉन अप्रतिम जाईल.
हे हि वाचा : Zaira Wasim Marriage : दंगल फेम जायरा वसीम अडकली लग्नबंधनात, निकाहाचे फोटो केले शेअर
महावतार नरसिंम्हा:
महावतार नरसिंम्हा हा चित्रपट थिएटर मध्ये यशस्वी ठरल्यानंतर OTT प्लॅटफॉर्म वर देखील धुमाकूळ घालत आहे. अश्विन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा ॲक्शन ॲनिमेटेड चित्रपट असून तुम्ही या विकेंडला चित्रपटाचाच आस्वाद घेऊ शकतात. यामध्ये भगवान विष्णूच्या वराह (Varaha) आणि नरसिंह (Narsimha) अवताराबद्दल माहिती देण्यात आली आहे. भारतीय सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा पहिला ॲनिमेटेड चित्रपट ठरला आहे.