Montha cyclone alert : बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचं क्षेत्र अधिक खोलवर गेलं आहे आणि ते हळूहळू पूर्व किनाऱ्याकडे सरकत आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगाल उपसागरावरील चक्रीवादळ 28 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.
कोणत्या राज्यांना अलर्ट :
हवामान विभागानं एका बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की 28 ऑक्टोबरच्या रात्री एक तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरुन ओलांडण्याची शक्यता आहे, ज्याचा वेग 100 किमी/ताशी असेल. IMD नुसार, चक्रीवादळ मोंथामुळं 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यानं भारतीय सैन्यही हाय अलर्टवर आहे.
वादळाचा कुठं होणार परिणाम?
आंध्र प्रदेश : काकीनाडा, विशाखापट्टणम, मछलीपट्टणम
ओडिशा : गोपालपूरजवळील प्रभाव
तामिळनाडू : चेन्नईपासून दूर, पण सतर्क राहण्याचं अलर्ट
मुसळधार पावसाची शक्यता (Montha cyclone alert)
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आणि ओडिशाच्या किनाऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळच्या कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोडमध्ये आज पावसासाठी आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अलाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि वायनाडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच मच्छिमारांना 29 ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत नैऋत्य आणि मध्य बंगालच्या उपसागरात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
#Cyclonic_Storm “#Montha” [Pronunciation: Mon-Tha] over Southwest & adjoining
southeast Bay of Bengal
The Cyclonic Storm “Montha” [Pronunciation : Mon-Tha] over Southwest & adjoining
southeast Bay of Bengal moved west-northwestwards with a speed of 16 kmph during past 3
hours and… pic.twitter.com/EUqmQEC9dU— India Meteorological Department (@Indiametdept) October 26, 2025
नांदेडमध्ये 29 तारखेपर्यंत यलो अलर्ट (Montha cyclone alert)
राज्यातील नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं 29 ऑक्टोबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस, गडगडाटासह पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं जोरदार वारे येण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना या काळात सतर्क राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी, मोकळ्या जागी जाणं टाळा आणि वादळाच्या वेळी आश्रय घेण्याचंही सांगण्यात आलं आहे












