US helicopter plane crash China sea : अमेरिकेच्या लष्करातून मोठी दुर्देवी घटना समोर आली आहे. दक्षिण चीन समुद्रात अवघ्या ३० मिनिटाच्या अंतराने अमेरिकन नौदलाचं एक विमान आणि एक हेलिकाॅप्टर कोसळ्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या दुर्घटनेमुळे अनेक शंकांना वाव मिळाला आहे. या दुर्घटनेत एमएच-६० सीहाॅक हेलिकाॅप्टर आणि एफ/ए-१८ सुपर हाॅर्नेट विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेमुळे संशयाची सुई चीनकडे फिरवली जात आहे. त्याचे कारण ही तसेच आहे केवळ अर्धा तासात दोन अपघात झाल्याने शंकेला वाव मिळाला आहे.
अमेरिकाचा दुजोरा US helicopter plane crash China sea
अमेरिकन नौदलाने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. असे असले तरी वादग्रस्त अशा दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेची विमानं काय करत होती असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. अधिक माहिती देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलंय, या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही अमेरिकेला मदत करण्यास तयार आहोत. सराव करताना विमान दुर्घटना झाल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अमेरिकेच्या पॅसिफिक महासागरातील ताफ्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एमएच-६० आर सीहॉक हेलिकॉप्टर नियमित सरावासाठी यूएसएस निमित्झवरून रवाना झाल्यावर दुपारी २.४५ च्या सुमारास अपघातग्रस्त झालं. या हेलिकॉप्टरमध्ये तीन चालक सदस्य होते.
पहिल्या अपघातानंतर सुमारे ३० मिनिटांनी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी स्ट्राइक फायटर स्काडून २२ ज्याला फायटिंग रेडकॉक्स नावाने ओळखले जाते त्यातील एक एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट विमान यूएसएस निमित्झवरून रवाना झाल्यावर काही वेळाने दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानातील दोन्ही चालकाचा प्राण वाचला आहे. त्या दुर्घटनचा बचाव पथकाकडून शोध चालू आहे.










