Lenskart IPO Date : भारतातील प्रसिद्ध ऑनलाईन आणि ऑफलाईन चष्मा विक्री करणारी कंपनी लेन्सकार्टचा आयपीओ लवकरच उघडणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी ग्राहकांना चष्मा सनग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्सेस, आय टेस्टिंग सारख्या सुविधा देते. या लेन्सकार्ट सोल्युशनने त्यांच्या आयपीओची तारीख जाहीर केली आहे.
लेन्सकार्ट सोल्युशन लिमिटेड या कंपनीचा आयपीओ 31 ऑक्टोबर रोजी उघडणार असून 4 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. या कंपनीचा आयपीओ बंद झाल्यानंतर त्याचे शेअर्स 10 नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर समाविष्ट करण्यात येणार आहे.
या आयपीओ चा आकार 7 हजार 278 कोटी रुपये असणार आहे. या आयपीओमध्ये अँकर गुंतवणूकदार 30 ऑक्टोबर पर्यंत बोली लावण्याची शक्यता आहे. तर याची किंमत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
लेन्सकार्ट सोल्युशन लिमिटेड कंपनी मध्ये सॉफ्टबँक, एडीआयए आणि टेमासेक, केकेआर, अल्फा वेव्ह, टीपीजी आणि केदारा कॅपिटल या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या आयपीओ मध्ये 2 हजार 150 कोटी रुपयांच्या किमतीचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहे. याशिवाय प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांकडून ऑर फॉर सेल्सच्या माध्यमातून 12.75 कोटी शेअर्स विकल्या जातात.
लेन्सकार्ट कंपनीची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली होती. या कंपनीचे संस्थापक पियुष बन्सल, अमित चौधरी आणि सुमित कपाही यांचा समावेश आहे. या कंपनीत सॉफ्टबँकचे एसव्हीएफ II लाईटबल्ब, श्रोडर्स कॅपिटल आणि केदारा कॅपिटल फंड सारखे प्रमुख गुंतवणूकदार शेअर्स विकतील.










