Turkey Earthquake 6.1 Richter Scale : तुर्कीला भूकंपाचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षापूर्वीच तुर्कीत ७.८ तीव्रतेच्या धक्क्याने जवळपास ५० हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला. यातून सावरत नाही तोच आता पुन्हा एकदा ६.१ रिक्टर स्केलवर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामध्ये किती जिवितहानी झाली याबाबत तुर्कीच्या आपत्ती व आपत्त्कालीन व्यवस्थापन संस्थेने अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. तर तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगान यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.
तुर्कीच्या इस्तंबूल, बुरसा, मनिसा आणि इजमिर या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिक नैसर्गिक आपत्ती विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, या आपत्तीत कोणातेही जिवित नुकसान झालेले नसले तरी अनेक इमारतींना तडे गेल्याची माहिती देण्यात आली आहे. तुर्कीतील मोठा भाग हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे या देशात भूकंपाचे वारंवार धक्के जाणवतात. गेल्या दोन वर्षांत येथे भूकंपाचे अनेकदा धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
२०२३ मध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप
२०२३ मध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात ५३ हजाराहून अधिक नागरिकांचा जीव गेला होता. दक्षिणी आणि दक्षिण-पूर्व भागातील लाखो इमारती नुकसानग्रस्त झाल्या होत्या. शेजारील सीरियामधील उत्तरी भागात ६ हजाराहून अधिक नागरीकांचा जीव यामध्ये गेला होता. गेल्या तीन महिन्यांपासून या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरीक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तर अनेक मोडकळीस आलेल्या इमारती या लोकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. त्यामुळे या भागात न फिरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यात ६.१ तीव्रतेचा भूकंप –
जगातील काही मोजक्या देशात सातत्याने भूकंपाचे झटके जाणवतात. त्यात तुर्कीचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात तुर्कीतील उत्तर आणि पश्चिमी भागातील बालीकेसीर या राज्यातील सिंदरगीमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप आला होता. यामध्ये काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. यानंतर सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत.
सप्टेंबरमध्ये ४.९ तीव्रतेचा भूंकप (Turkey Earthquake 6.1 Richter Scale)
सप्टेंबरमध्ये तुर्कीतील बालिकेसीर या राज्यात ४.९ तीव्रतेचा भूंकप आला होता. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, बालिकेसीर या राज्यातील सिंदिरगीमध्ये भूंकपाचे केंद्रबिंदू हे ७.७२ किलोमीटर खोल होते. देशातील सर्वात मोठे शहर इस्तंबूलसह अनेक भागांमध्ये भूकंपाचे झटके जाणवले आहे. त्यामुळे नागरीक भयभीत झाले आहेत.












