Chanakya Niti Success Tips : आचार्य चाणक्य एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे. त्यांचे संपूर्ण नाव विष्णूगुप्त शिरोमणी असे आहे. त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्यांनी प्राचीन भारतीय साम्राज्याचे संचालन केले असून ते मौर्य समाजाच्या महान सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे प्रधानमंत्री होते. त्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य नीति, कौटिल्य अर्थशास्त्र आणि कौटिल्य सूत्रे हे लेखन मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला. आपल्या सर्वांना त्यांनी लेखन केलेल्या चाणक्य नीति अनुभवांचा संग्रह माहिती आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी नक्कीच चाणक्य नीतीचा अवलंब केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती यासाठी संघर्ष करतो परंतु काहींना यामध्ये यश मिळते तर काही अपयशी होतात. परंतु खरंच यशस्वी तो होतो जो इतरांना यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतो. त्याचबरोबर नियम आणि शिस्तीने मिळालेले हे यश शाश्वत असते. आणि अशा लोकांवर माता लक्ष्मी ची कृपा कायम असते. ज्यांना खऱ्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल त्यांनी या गोष्टी आचरणात आणणे गरजेचे आहे.
वायफळ खर्च टाळा
चाणक्य नीति नुसार, जीवनामध्ये सौंदर्य अन्न आणि पैसा याला भाळून कधीच असंतृष्ट राहू नये. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, किंवा जेवढी संपत्ती आहे त्यावरच खुश राहिले पाहिजे. पैशांच्या मागे पळणे हे अत्यंत चुकीचे असून पैशांचे नियोजन करूनच खर्च केला पाहिजे. बऱ्याचदा गरज नसलेल्या वस्तूंमध्ये किंवा त्या खरेदी करण्यामध्ये विनाकारण पैसा खर्च करावा लागतो. अशावेळी कमी पैसे खर्च करा म्हणजे तुम्हाला कधीच कमतरता भासणार नाही.
चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करणे गरजेचे
चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तींना कोणतेही काम करण्यापूर्वी चांगली आणि वाईट गोष्ट हे समजते किंवा चांगल्या आणि वाईट गोष्टींचा विचार करणारा व्यक्ती आयुष्यात कधीच अयशस्वी ठरत नाही. त्या व्यक्तीला कधीच अडचणी देखील येत नाही. त्यामुळे कधीही एखादी गोष्ट करण्यापूर्वी दोन्ही पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे. जेणेकरून होणारे दुष्परिणाम आणि फायदा आपल्याला समजू शकेल.
वैवाहिक जीवनात करू नका हे
बरेच व्यक्ती लग्न झाल्यानंतर इतर महिलांकडे आकर्षित होतात. यामुळे वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि तुमच्या पार्टनर चा विश्वास तुटू शकतो. त्यामुळे चाणक्य नीती नुसार वैवाहिक जीवनात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी इतर महिलांकडे आकर्षित होऊ नका.
मैत्री करताना या गोष्टीचा विचार करा
चाणक्य नीति नुसार, मैत्री विचार करून करणे गरजेचे आहे. कारण मैत्रीचा तुमच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रभाव पडत असतो. यासोबतच मैत्री करत असताना तुमच्यापेक्षा जास्त किंवा कमी पदावर असलेल्या व्यक्तीसोबत मैत्री करू नका. कारण यामुळे तुमची मैत्री कधीच आनंद देऊ शकत नाही. यासोबतच तुम्हाला या लोकांच्या संगतीमुळे अपमान सहन करावा लागतो.
स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका
जगात जे व्यक्ती चुकांमधून शिकतात ते अपयशी ठरत नाही. ते नेहमी यशस्वी होतात. चाणक्य नीति नुसार स्वतःवर प्रयोग करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकले पाहिजे. स्वतःवर प्रयोग केला तर तुमचे वय कमी होईल. त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकांमधून बोध घेणे आणि त्या चुका आपण न करणे, यातून जीवनामध्ये यश मिळते












