Radhika Bhide Man Dhavantaya : आय पॉपस्टार च्या मंचावर एका सौंदर्यवतीने मन धावतया हे गाणं गायलं. या गाण्यासोबतच तिने केलेला सुंदर मराठमोळा साज देखील साजेसा होता. पण तुम्हाला माहिती आहे का ही आयपॉपस्टार फ्रेम राधिका भिडे कोण आहे. या सौंदर्यवतीचे कोकणाशी काही खास संबंध असल्याचंही उघड झालंय.
सध्या सोशल मीडियावर ‘मन धावतंया तुझ्याच मागं डोलतया तुझ्याचसाठी’ हे गाणं प्रेक्षकांना खूप वेड लावत आहे. या गाण्याने प्रत्येकाच्या स्टोरीवर स्टेटसवर आणि प्लेलिस्ट मध्ये अप्रतिम स्थान मिळवलंय. हे गाणं आय पॉपस्टार या हिंदी कार्यक्रमात राधिका भिडे या सुंदर अशा मुलीने गायले आहे. या गाण्याची तुफान चर्चा होत असून प्रेक्षकांना या गाण्याने प्रचंड भुरळ घातली आहे. तिने यावर केलेला साजेसा साज देखील या गाण्याला शोभेल असा आहे.
कोण आहे राधिका भिडे
‘मन धावतंया तुझ्याच मागं डोलतया..’ हे गाणं गायलेली ही मुलगी रत्नागिरीची लेक असून तिचं नाव आहे राधिका भिडे. ती गेल्या काही वर्षापासून मुंबईमध्ये राहत आहे. राधिका ही संगीत दिग्दर्शक, निर्माती, गीतकार आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून देखील नावारूपास आली आहे. तिने गायलेले हे गाणे सर्वांच्या मनाला भावले. याशिवाय तीने केलेला सुंदर असा मराठमोळा साज देखील काही कमी नव्हता. तिने नेसलेली नऊवारी साडी, नाकात नथनी आणि माथ्यावर चंद्रकोर प्रत्येकाचं मन जिंकून घेणारा साज तिने केला होता. एमएक्स प्लेयर वर या कार्यक्रमाचा प्रोमो सादर झाल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ अत्यंत व्हायरल झाला आहे.
आय पॉपस्टार या कार्यक्रमांमध्ये वेगळीच थीम
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू असलेला आय पॉपस्टार या कार्यक्रमांमध्ये वेगळीच थीम वापरण्यात आली आहे. ही थीम प्रत्येक रियालिटी शोपेक्षा वेगळी असून प्रत्येकाला एक आव्हान देणारी आणि ते आव्हान पूर्ण करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हा शो खास आहे. या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आठवड्यात देण्यात आलेल्या थीमनुसार स्पर्धकांनी स्वतः गाणे लिहायचे त्याला संगीत देखील द्यायचं आणि ते सादरही करायचे. एवढेच नाही तर ह्या गाण्याला सोशल मीडियावर किती प्रसिद्धी मिळते हे देखील निकालात गणले जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
गुजराती गाण्यांसाठी देखील काम (Radhika Bhide Man Dhavantaya)
राधिका भिडे ही संगीतकार एवढीच तिची ओळख नाहीये. तिने या रियालिटी शो पूर्वी ताजा खबर 2, दे धक्का 2, आणि हर हर महादेव या प्रकल्पांसाठी बॅकग्राऊंड स्कोर आणि व्होकल प्रोडक्शन देखील केले आहे. याशिवाय तिने गुजराती गाण्यांसाठी देखील काम केले. ती रत्नागिरीची असून सध्या मुंबईत राहण्यास आहे.










