Common password data leak risk : सध्या सायबर क्राईमचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. या प्रमाणात जास्त करून पर्सनल डेटा लीक होणे हे कारण आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का आपला डेटा लीकी कोणत्या चुकीमुळे होतो. पर्सनल डिव्हाइसेस मधील पर्सनल डेटा लिक होण्यामागे कॉमन पासवर्ड हे सर्वात जास्त आणि महत्वाचे कारण आहे.
आज-काल पासवर्ड लक्षात ठेवण्याची झणझट न करता सहसा लक्षात राहील असा पासवर्ड जो की साधा सिंपल असेल असा पासवर्ड ठेवला जातो. परंतु यामुळे तुमचा फोन लॅपटॉप किंवा सीसीटिव्ही कॅमेरा काही सेकंदातच हॅक होऊ शकतात.
काही दिवसांपूर्वी गुजरात मध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या माध्यमातून प्रसूती रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज हॅक करून पॉर्नोग्राफी वेबसाईटवर अपलोड करण्यात आले होते. असा प्रकार फक्त गुजरात मध्येच नाही तर दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये सर्वात जास्त बघायला मिळाले. या टोळीने देशभरातील सिजरिबी सिस्टीम हॅक करून 50,000 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप चोरी केल्या. या क्लिप मध्ये महिला कपडे बदलताना, रुग्णालयात तपासणी करतानाचे व्हिडिओ यांचा समावेश होता.
ही घटना घडण्याचे खरे कारण होते ते म्हणजे डिफॉल्ट किंवा सामान्य पासवर्ड. ऍडमिनिस्टेटचा लॉगिन पासवर्ड हॅक करून सीसीटीव्ही सिस्टीम मध्ये ओपन करण्यात आला होता. या सीसीटीव्हीचा पासवर्ड होता admin123. तुम्ही देखील अशाच प्रकारचे कॉमन पासवर्ड ठेवत असाल तर सावध होण्याची गरज आहे.
डिफॉल्ट पासवर्ड (Common password data leak risk)
जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलला वायफाय कनेक्ट करता किंवा सीसीटीव्ही बसवतात तेव्हा त्यासाठी पासवर्डची आवश्यकता असते. अशावेळी सर्विस दाता हा तुमच्या घरी किंवा ऑफिसला डिफॉल्ट पासवर्ड देतात. आणि हे पासवर्ड नंतर चेंज करण्यास देखील सांगितले जाते. परंतु आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि हे पासवर्ड बदलत नाही.




