accidents in India : मागील महिन्याभरात अनेक मोठ्या अपघातांची नोंद झाली, आणि आपघातांची मालिका सुरुच आहे. यापैकी अनेक अपघात राजस्थानमध्ये झाले आहेत. या अपघातांमध्ये 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमध्ये जैसलमेर, जयपूर, जोधपूर आणि तेलंगणामधील अपघातांचा समावेश आहे.
जैसलमेरमध्ये बसला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू : 14 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील जैसलमेरमध्ये 35 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. अपघाताच्या वेळी 20 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. खाजगी बस जैसलमेरहून जोधपूरला जात असताना अचानक आग लागली. हा अपघात थैयत गावाजवळ झाला.
बसचा विजेच्या तारेशी संपर्क :
28 ऑक्टोबर रोजी जयपूरच्या मनोहरपूर पोलीस स्टेशन परिसरात आणखी एक अपघात झाला. तोडी गावात कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचा हाय-टेन्शन लाईनशी संपर्क आला, ज्यामुळं बसला वीज कोसळली. बसमधील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे डझनभर जण भाजले. मिळालेल्या माहितीनुसार, कामगारांना घेऊन जाणारी बस उत्तर प्रदेशहून मनोहरपूरच्या तोडी येथील एका वीटभट्टीत आली होती. वाटेत बसचा 11000 व्होल्टच्या वायरशी संपर्क आला, ज्यामुळं बसमधून करंट वाहत गेला आणि आग लागली.
हे हि वाचा : सावधान, तुम्हीही ठेवला आहे का असा सर्वसाधारण पासवर्ड, मग तुमच्या डिवाइस मधील डेटा देखील होणार लीक
जोधपूरमध्ये 25 जणांचा मृत्यू :
रविवार, 2 नोव्हेंबर रोजी जोधपूरमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला. फलोदी जिल्ह्यातील माटोडा इथं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक ट्रेलरला एक टेम्पो ट्रॅव्हलर धडकला. यात पंधरा जणांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले. कोलायतला भेट देऊन यात्रेकरु जोधपूरला परतत असताना त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला.
तेलंगणामध्ये 20 जणांचा मृत्यू :
03 नोव्हेंबरला तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातही एक दुःखद अपघात झाला. मिर्झागुडा इथं टीजीएसआरटीसी बसला टिपर ट्रकनं धडक दिली. या अपघातात वीस जणांचा मृत्यू झाला. या अपघातात वीस जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 3 तारखेला सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. खडी भरलेल्या लॉरीशी धडकल्यानंतर बस खडी आणि ढिगाऱ्यात बुडाली.
जयपूरमध्ये डंपरनं पादचाऱ्यांना चिरडलं : (accidents in India)
राजस्थानमधील जयपूरमध्ये आणखी एक दुर्दैवी अपघात घडला. एका अनियंत्रित डंपर ट्रकनं 10 वाहनांना धडक दिली. यात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातही 14 जणांचा मृत्यू झाला.









