Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री मैदानात, ‘या’ ४० बड्या नेत्यांची यादी जाहीर
Top News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री मैदानात, ‘या’ ४० बड्या नेत्यांची यादी जाहीर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठा मास्टरस्ट्रोक गेम खेळला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे व अन्य दिग्गजांची नावे या स्टार प्रचारक यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, गणेश नाईक, जयकुमार रावल, नारायण राणे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, आशिष शेलार, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मेघना बोर्डीकर, रावसाहेब दानवे, अमर साबळे, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. भागवत कराड, गोपीचंद पडळकर, संजय कुटे, अमित साटम, धनंजय महाडिक, माधवी नाईक, रणधीर सावरकर, अशोक नेते, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड हे नेतेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार करताना दिसत आहे.

हेही वाचा – Prashant Kishor : प्रशांत किशोरांनी ठेवली शर्त; म्हणाले, सरकारने हे काम केले नाही तर, मी राजकारण सोडणार..

डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्याडिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणरा आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक ठिकाणी भाजपने मित्रपक्षांची युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच लागलेल्या बिहार निवडणुकीच्या निकालाने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच जोशात भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यात उतरणार आहे.

राज्यभर प्रचारासाठी ४० नेत्यांची फौज

पूर्वी स्टार प्रचारकांची संख्या केवळ २० इतकी मर्यादित होती. मात्र, राजकीय पक्षांच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाने ही संख्या दुप्पट म्हणजेच ४० केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या ४० नेत्यांची फौज राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवणार आहे. विशेष म्हणजे, अल्पसंख्याक समाजातील इद्रिस मुलतानी आणि माजी खासदार अमर साबळे यांच्यावरही प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये भाजपचे हे मिशन इलेक्शन किती यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts