Conflict between Chandrakant Patil and Ajit Pawar : महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी, राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे, घड्याळाच्या पाठीशी उभं राहिलात तर बारामती सारखा विकास तुमच्याकडे करील, असे विधान केले होते. या विधानाने विरोधकांनी सरकारवर थेट पक्ष निष्ठेच्या आधारे विकासाचे आश्वासन देत असल्याचा आरोप करण्यात आला.
माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री भैरवनाथ महादेवाचे दर्शन घेऊन, अभिषेक करून केला. माळेगावच्या विकासासाठी कार्यरत महायुतीतील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ह्या शुभारंभाला मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्वांचे… pic.twitter.com/ccbmshU4qL
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 21, 2025
मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडली तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे
महायुती सरकारमधील तीन पक्षांमध्ये सध्या अंतर्गत उफाळल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गटात संघर्ष सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद रंगल्याचे दिसत आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये आयोजित प्रचार सभेत भाजप आमदार चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कडवट इशारा दिल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरीही त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येणार नाही आणि जर ती उघडली तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे,’ असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर दिला. त्यामुळे सत्ताधारी पक्षात राज्याच्या तिजोरीवरून संघर्ष शिगेला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
📍 २४ नोव्हेंबर २०२५ | कोल्हापूर
आज गडहिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ काळभैरव व आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तसेच महात्मा बसवेश्वर आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संपन्न झाला.
या प्रसंगी नागरिकांशी संवाद… pic.twitter.com/m5q0nrYwt5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 24, 2025
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार, पुढील सुनावणीपर्यंत सस्पेंस कायम..
संविधानाने कोणत्याही मंत्र्याला तिजोरी लुटण्याचा अधिकार दिलेला नाही
“राज्याची तिजोरी एखाद्या व्यक्तीची संपत्ती नसून संपूर्ण जनतेचा निधी आहे. संविधानाने कोणत्याही मंत्र्याला तिजोरी लुटण्याचा किंवा तिजोरीचा वापर पक्षीय स्वार्थासाठी करण्याचा अधिकार दिलेला नाही. विकासाच्या नावाने मतं मागण्याऐवजी सत्ता आणि पैशांची भाषा करणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याचे पटोले म्हणाले. ते पुढे म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतःच्या अधिकारांची मिरवणूक करत फिरतात आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्ष आपली ताकद दाखवत जनतेसमोर गर्विष्ठपणे बोलतो. महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकले आहेत का? अशीच भाषा या लोकांकडून ऐकायला येते, असा कडवा सवाल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.
जनता हा गर्व चूर करून टाकेल..
लोकांनी निवडून दिल्याचा अर्थ नेता मालक झाला असा होत नाही. सत्तेत बसलेले लोक हे पाच वर्षांसाठी जनतेचे सेवक आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. पटोले यांचा आरोप असा की, सत्तेचा माज आणि गर्व इतका वाढला आहे की सत्ताधारी जनता सर्व सहन करेल, हे त्यांना गृहित धरलं आहे. जनता तुम्हाला सत्तेत बसवते, तशीच ती तुम्हाला खालीही खेचू शकते. मालकाची भाषा आणि धमकीची भाषा लोकशाहीत चालत नाही. जनता हा गर्व चूर करून टाकेल, असा थेट इशारा पटोले यांनी अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांना दिला, नाना पटोले यांनी या वक्तव्यावर कडक शब्दांत टीका केली.
अजित पवारांच्या शेतीच्या उत्पन्नाचा किंवा कारखान्याच्या उत्पन्नाचा भाग आहे का ते ?
महाराष्ट्र राज्याची तिजोरी अजित पवार यांच्या घरचा किंवा काटेवाटीच्या उत्पन्नाचा काही भाग आहे का तिजोरात म्हणून त्यांच्या हातात आहे. जनतेच्या करातून तुम्ही देताय, ते काय तुमच्या घरचा अधिकार आहे का ? ते काय तुमच्या शेतीच्या उत्पन्नाचा किंवा कारखान्याच्या उत्पन्नाचा भाग आहे का तो ? जनतेच्या करातून विकास साधला जातो, आणि ते काट मारणारे तुम्ही कोण ? मला वाटतंय जनता यांनाच काट मारेल मग यांच्या लक्षात येईल, अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.











