Praful Patel Meets Bhujbal : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकष्मित मृत्यूमुळे महराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खाली झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवरून तर सध्या राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? हे भल्याभल्या जाणकारांना समजना झालंय. पक्षातील जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची आणि आपल्या पुतण्याला मंत्रिमंडळात घेण्याची इच्छ व्यक्त केली होती. मात्र, पक्षाकडून यावर नकार आल्यानंतर ते कमालीचे नाराज झाल्याचे दिसून येत आहेत. त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल त्यांच्या भेटीस गेल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याकरिता काही अटी ठेवल्या होत्या. त्या अटीला भाजपकडून ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, अचानक छगन भुजबळ यांच्या नावाची नाही तर राजेंद्र जैन यांच्या नावाची वर्णी लागली आणि इथून सुरू झाले नाराजी नाट्य. हा फक्त नाराजीवर नाही भुजबळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाकडून माध्यमांसमोर सांगितलं गेलं ते नाराज नाहीत परंतू त्यांच्या नाराजीची सध्या राज्यभर तुफान चर्चा रंगताना दिसून येत आहे.
राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत राष्ट्रवादी पक्षात मागील अनेक दिवसांपासून चर्चा रंगत होती. जेष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी उत्सुक होते, मात्र आता राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आल्याने ते नाराज असल्याचे दिसून आले आहेत.
बैठकीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता छगन भुजबळ निघून गेले
छगन भुजबळ यांची राज्यसभेच्या जागेवर वर्णी न लागल्यामुळे भुजबळ पक्षात नाराज असल्याची चर्चा असतानाच देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता छगन भुजबळ आणि समीर भुजबळ निघून गेले. समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद देण्यासाठी अट घालण्यात आली होती, त्याला भाजपकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांच्यासारख्या जेष्ठ आणि मातब्बर नेत्याला डावलून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला न उलगडणारे कोडे आहे. एक मात्र नक्की आहे या निमित्ताने राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याकडून भुजबळांची समजूत काढली जात आहे
छगन भुजबळ नाराज असल्याचे यावरून दिसत आहे. नुकताच प्रफुल्ल पटेल हे छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले आहेत. प्रफुल्ल पटेल हे मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगल्यावर दाखल झाले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून भुजबळांची समजूत काढली जात असल्याचे कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. विधान परिषदेमध्ये आणि गोंदिया भंडारा येथे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. राजेंद्र जैन यांनी दीर्घकाळ काम केलेला आहे. मात्र, राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करत मोठा धक्का भुजबळांना देण्यात आला.












