Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • NEET RE Exam आधी टेलिग्राम बंद; व्हॉट्सअॅप मात्र कायम सुरू, कारण वाचून आश्चर्य वाटेल?
शैक्षणिक बातम्या

NEET RE Exam आधी टेलिग्राम बंद; व्हॉट्सअॅप मात्र कायम सुरू, कारण वाचून आश्चर्य वाटेल?

NEET RE Exam 2026 Telegram Ban

NEET RE Exam 2026 Telegram Ban: NEET RE Exam आधी टेलिग्रामवर निर्बंध घालण्यात आली आहे. मात्र व्हॉट्सअॅप बंद का नाही, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडला आहे.

नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलेग्रामवरील काही सुविधांवर आणि चॅनेल्सवर कठोर कारवाई केली आहे. २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेदरम्यान पेपर लीक, बनावट प्रश्नपत्रिका आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईनंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, टेलिग्रामवर निर्बंध लावले जात असताना व्हॉट्सअॅपवर अशी कोणतीही कारवाई का करण्यात आलेली नाही?

हेही घ्या: प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या मानेला पट्टी; नेमकं काय झालं? स्वतःच सांगितलं कारण

टेलेग्रामचा गैरवापर वाढल्याची चिंता

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, टेलिग्रामवर NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विक्रीसाठी जाहिराती केल्या जात होत्या. यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या संख्येने पैशाची मागणी करून त्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या. अनेक चॅनेल्स हटवुनही अशा प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये घट न झाल्याने अधिक कठोर पावले उचलण्यात आली.

टेलिग्रामआणि व्हॉट्सअॅपमध्ये फरक काय?

दोन्ही अॅप्स मेसेजिंगसाठी वापरली जात असली तरी त्यांची रचना वेगळी आहे. टेलिग्राममध्ये वापरकर्त्यांना फोन नंबर सार्वजनिक न करता केवळ युजरनेमच्या आधारे खाते चालवता येते. तसेच मोठ्या प्रमाणात सदस्य असलेले चॅनेल्स आणि ग्रुप्स तयार करण्याची मुभा असल्यामुळे माहितीची प्रसार अतिशय वेगाने होऊ शकतो.

व्हॉट्सअॅपमध्ये मात्र वापरकर्त्यांची ओळख फोन नंबरशी जोडलेली असल्याने पूर्णपणे अनामिक राहणे तुलनेने कठीण ठरते.

मोठ्या फाइल्स शेअर करण्याची सुविधा

टेलीग्रामवर मोठ्या आकाराच्या फाइल्स सहज पाठवता येतात. त्यामुळे PDF, कागदपत्र किंवा इतर सामग्री मोठ्या प्रमाणात वितरित करणे सोपे होते. याशिवाय पाठवलेले संदेश नंतर संपादित करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. काही गैरप्रकारांमध्ये या सुविधांचा गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅपची सुरक्षा व्यवस्था

व्हॉट्सअॅपमध्ये एंड- टू- एंड एन्क्रिप्शन असल्यामुळे खासगी संदेश थेट वाचता येणार नाहीत. मात्र संशयास्पद हालचाली, स्पॅम नेटवर्क्स आणि फसवणुकीशी संबंधित पॅटर्न शोधण्यासाठी विविध तांत्रिक यंत्रणा वापरल्या जातात. त्यामुळे गैरवापर करण्याऱ्या गटांसाठी ते तुलनेने कमी अनुकूल मानले जाते.

टेलेग्रामच्या धोरणांवरही चर्चा

टेलीग्रामचे संस्थापक पावेल दुरोव हे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर भर देणाऱ्या भूमिकेसाठी ओळखले जातात. यामुळे अनेक देशांमध्ये टेलिग्रामच्या नियमनाबाबत चर्चा होत असते. दरम्यान, टेलेग्रामनेही अलीकडच्या काळात संशयास्पद चॅनेल्स आणि ग्रुप्सविरुद्ध कारवाई वाढवल्याचा दावा केला आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

परीक्षेसंदर्भातील कोणतीही माहिती मिळाल्यास ती अधिकृत संकेतस्थळे आणि अधिकृत घोषणांमधूनच पडताळून पाहावी. पेपर लीक, हमखास यश किंवा गुप्त प्रश्नपत्रिका देण्याचा दावा करणाऱ्या व्यक्ती आणि चॅनेल्सपासून सावध राहणे आवश्यक आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts