congress vanchit alliance bmc : राज्यात होऊ घातलेल्या महापालिकेच्या दृष्टीने सध्या मोठ्या घडामोडी घडताना समोर येत आहे. राज्यात आघाडी आणि युती यांच्याभोवती राजकारण फिरत आहे. मात्र, काँग्रेस आणि वचिंत आघाडीने एक नंबर पडकावला आहे. केवळ दोन दिवसांत आघाडीची अधिकृत घोषणा गेली आहे. त्याचबरोबर थेट जागावाटपाची पहिली यादीच प्रसिद्ध केलीय. त्यामुळे दोन्ही पक्षाला लवकरच उमेदवार जाहीर करता येणार आहेत. तर उमेदवारांना प्रचार करण्यास अधिकचा वेळ मिळणार आहे. या नव्या समीकरणामुळे मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – BMC साठी महायुतीचं जागावाटप ठरलं? समोर आला नवा फॉर्म्यूला
वंचित बहुजन आघाडीने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. या अधिकृत पत्रानुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. विशेष म्हणजे, या ६२ जागांच्या यादीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यात आता कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ऑनलाईन बैठकीद्वारे मान्यता दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडे देण्यात आलेल्या ६२ जागांमध्ये वॉर्ड क्र. ६, ११, १२, ८४, ९५, १२७, १५३ आणि २२५ यांसारख्या विविध महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.
मुंबईच्या विकासासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी एकत्र
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या युतीचे स्वागत करताना सांगितले की, काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. १९९९ नंतर राजकीय कारणांमुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत होते, मात्र तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष मुंबईच्या विकासासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून विचारांची आघाडी असल्याचे त्यांनी नमूद केले.
काँग्रेस-वंचित युतीमुळे दलित, मुस्लिम आणि बहुजन मतांचे विभाजन थांबणार
या युतीमुळे दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांमध्ये होणारे विभाजन या युतीमुळे थांबण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा काँग्रेस-वंचितला होऊ शकतो. एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने निर्माण झालेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हा वंचित कार्डचा मास्टरस्ट्रोक वापरल्याचे पाहायला मइळत आहे. मात्र या युतीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.









