ठिकाण भिगवण, वेळ दुपारी साडे तीनची.. मंगळवारी पुणे जिल्ह्यातील भिगवण बाजारपेठेत अपहरणाची घडना घडली अन् संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. अपहरण झालेल्या मुलीचे लग्न चार ते पाच दिवसांवर आलं होतं. त्यासाठी खरेदीची लगबघ सुरू होती. २१ वर्षीय तरुणी आणि तिचे कुटुंबीय लग्नाची खरेदी करण्यासाठी भिगवणला आले होते. लग्नाची खरेदी करून मुलगी तिची आई आणि भाऊ घरी निघाले. मात्र दबा धरून बसलेल्या दोन नराधन आरोपींनी कमी वर्दळीचे ठिकाण आनंद हाॅटेलच्या पाठीमागे त्यांना गाठलं. आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली भाऊ अन् आईच्या डोळ्यात लाल मिरची पावडर फेकले. यामुळे ते दोघेही अंधळे झाले अन् आरोपींनी आपला डाव साध्य केला. त्यानंतर ही सर्व थरारक घटना घडली.
आई अन् भावाने मोठ्याने टाहो फोडला, हंबरडे, ओरडले मदतीची भिक मागितली. आईने पदर पसला पण मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता. त्यांना आठवत असणार, आपल्या डोळ्यासमोर ओरबडत घेऊन जाणारे हे नराधम कोवळ्या जीवाशी काय करतील. ज्या माईने नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरात आढवले, हाताला धरून चालायला शिकवले, बोलायला शिकवले मागील २० वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलीला वाढले अन् ज्या भावाने बहिणीचे आजपर्यंत लाड पुरवले त्यांच्या डोळ्यादेखत ही विदारक घटना घडली.
भावाने बहिणाच्या लग्नाचे स्वप्न बघितले त्यांच काय?
बघता-बघता ही संपूर्ण बातमी राज्यात पसरली अन् या घटनेला धार्मिक रंग चढला. कारण आरोपी मुस्लिम होते. हिंदुत्ववादी संघटनांना तर आयते कोलित मिळाले. आपले राजकीय डाव साधणारे समोर आले. मात्र, ज्या माऊलीची मुलगी गेली अन् ज्या भावाने बहिणाच्या लग्नाचे स्वप्न बघितले त्यांच काय? पुढे या कुटुंबाला याच समाजात राहायचंय, जगायचंय त्याचा विचार कोणी करणार आहे का नाही. संकटाच्या काळात आपण समाज म्हणून एकत्र येयलाच पाहिजे पण त्याआधी स्वतःचा स्वार्थ आणि हेवेदेवे बाजूला ठेवले पाहिजेत.
महिनाभरापासून फोन काॅल आणि हाॅट्सअॅप चॅटींगवर बोलणं सुरू होतं
ही घटना अपहरणाची वाटत असतानाच पोलिसांचा तपासात धक्कादायक खुलासे समोर आलेत. ज्या मुलीचं अपहरण झालंय ती मुलगी आणि आरोपी मुलगा शेजारी-शेजारी राहात होते. याशिवाय तरुणी आणि आरोपींपैकी एका तरुणामध्ये महिनाभरापासून फोन काॅल आणि हाॅट्सअॅप चॅटींगवर बोलणं सुरू होतं. त्यामुळे हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असण्याची शक्यता पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासून उघड केली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार मुलीला माहिती होता आणि त्यामध्ये मुलगी देखील सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. ज्यावेळी आरोपी मुलीच्या आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत होते. तेव्हा मुलीने कोणताही आरडा-आरडा केला नाही किंवा गाडीत जाताना देखील आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे या प्रकरणाकडे प्रेम संबंधातून घडलेली घटना असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
दोन सख्या भावांनी मिळून मुलीचे अपहरण केलं
या प्रकरणाची भिगवण पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केलाय. जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोन सख्या भावांनी मिळून मुलीचे अपहरण केलं. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज भिगवण बंदची हाक देखील देण्यात आलीय. तर दुसरीकडे काही मुस्लीम संघटनांनी देखील या प्रकरणातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना शिक्षा देण्यात यावी, अशी निवेदने पोलिसांना दिलीत. अपहरणाच्या घटनेचे कोणीच समर्थन करणार नाही आणि करू ही नये. मात्र, घटनेतील दोन्ही बाजू समजून घेणं देखील तेवढचं महत्त्वाचं आहे. पोलिसांची तपासाची चक्र फिरवली अन् सहा पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलीत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी केली
पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी केली असून टोल नाक्यांवर तपास वाढवलाय. काही रिपोर्ट्सनुसार १६५ किलो मीटरचा रूट मॅप तयार केला. मुलीचा आणि आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर संताप उसळला असून सकल हिंदू समाज आणि स्थानिक नागरिकांनी भिगवण बंद पुकारला. तर पुणे-सोलापूर महामार्ग काही काळ रोखला, टायर जाळले, जनआक्रोश मोर्चा काढला. हिंदू संघटना आक्रमक झाल्या, मोर्चे आणि निदर्शने झाली. पोलिसांनी तणाव टाळण्यासाठी गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप या राजकीय नेत्यांना रॅली काढण्यास परवानगी नाकारली. ही घटना प्रेमप्रकरण की जबरदस्ती अपहरण याबाबत तपास सुरू आहे. सध्यापर्यंत मुलीचा शोध लागलेला नाही, पण पोलिसांचा तपास जोरात सुरू आहे.












