Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “आमच्या संविधानाचा आम्हाला अभिमान वाटतो…”, कोर्टानं निर्दोष सुटका केल्यानंतर मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया
ताज्या बातम्या

“आमच्या संविधानाचा आम्हाला अभिमान वाटतो…”, कोर्टानं निर्दोष सुटका केल्यानंतर मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया

Manish Sisodia | आज दिल्लीतील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात (Delhi Liquor Policy Case) राउज एवेन्यू कोर्टानं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा दिला आहे. कोर्टानं अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्या दोघांनाही कोर्टानं क्लीन चीट दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर मनीष सिसोदिया यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – दारू घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता! कोर्टाच्या निकालानंतर अरविंद केजरीवालांना अश्रू अनावर

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काय म्हणाले मनीष सिसोदिया?

कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “आज आम्हाला पुन्हा एकदा आमच्या संविधानाचा अभिमान वाटतो. तसेच आम्हाला असे संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अभिमान वाटतो. आज पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला आहे”, असं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल भावूक

कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल भावूक झाले होते. “माझ्याविरोधातलं हे प्रकरण खोटं होतं. आमच्या पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरूंगात टाकण्यात आलं. सोबत एका विद्यमान मुख्यमंत्र्याला त्याच्या घरात जाऊन अटक करून तुरूंगात टाकलं. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांनी मिळून सर्वात मोठा कट रचला होता”, असा आरोप केजरीवालांनी केला आहे.

दरम्यान, दारू घोटाळा प्रकरणाचा निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, कोर्ट कोणत्याही आरोपांवर तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा त्याच्यासोबत भक्कम असा पुरावा असेल. नुसता दावा करून चालणार नाही पर्याप्त पुरावा असायला हवा. तसेच तपास यंत्रणेने दिलेले पुरावे हे अपर्याप्त आणि कमजोर आहेत, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

 

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts