Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अंबरनाथमधील ३१ घरांवरील कारवाईविरोधात नागरिकांचे उपोषण सुरूच
Mumbai

अंबरनाथमधील ३१ घरांवरील कारवाईविरोधात नागरिकांचे उपोषण सुरूच

Citizens' hunger strike

Citizens’ hunger strike : अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर एकतानगर परिसरातील ३१ घरांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न काढता घरांवर कारवाई केल्याचा आरोप करत नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

कारवाई झाल्यानंतरही स्थानिक नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असून प्रशासनाने तातडीने पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. एकतानगर येथील ३१ घरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात नागरीकांनी आंदोलन छेडले आहे.

आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशीही अनेक महिला उपोषणस्थळी सहभागी झाल्या. महिलांनी रस्त्यावर उतरून सरकार आणि प्रशासनावर तीव्र प्रश्न उपस्थित केले. “लाडक्या बहिणींचा सन्मान करण्याच्या घोषणा दिल्या जातात, मात्र आज त्या बहिणींच्याच घरांवर कारवाई होत आहे,” असा आरोप महिलांनी केला. महिला दिनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने काही प्रमाणात महिलांमध्ये नाराजी पसरत असताना दिसत आहे.

दरम्यान, या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. पुनर्वसनाचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts