Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तिरंगा खांद्यावर घेत माहिकाची घेतली पप्पी, वकिलांनी दिली कायद्याची तंबी
Top News

तिरंगा खांद्यावर घेत माहिकाची घेतली पप्पी, वकिलांनी दिली कायद्याची तंबी

Hardik Pandya in controversy

Hardik Pandya in controversy : हार्दिक पांड्या कधी त्याच्या भन्नाट खेळामुळं चर्चेत, तर कधी वादामुळे चर्चेत. आता वर्ल्डकप जिंकल्यानंतरही हार्दिक आणि वाद हे समीकरण पुन्हा सुरू झालंय. यावेळी तो त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आलाय. हार्दिक पांड्या T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत पाहयला मिळाला. मात्र यावेळी त्याने आपल्या खांद्यावर तिरंगा झेंडा घेत माहिकासोबत पप्पी झप्पी घेताना दिसला. यामुळे तिरंगा झेंड्याचा अवमान झाल्याचा आरोप करत वकील वाजित खान यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हार्दिकला कायद्याची तंबी देण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे.

हेही वाचा – T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचं पुढचं मिशन कोणतं? सूर्यकुमारने यादनवे केला खुलासा, म्हणाला, “आमचे पुढचे ध्येय…”

पण सध्या चर्चेत असलेला हार्दिक पांड्या कशी लाईफस्टाईल जगतो? त्याचे सध्या नेटवर्थ किती आहे आणि तो क्रिकेटसोडून इतर कोणत्या मार्गाने पैसे कमावतो? त्याची गर्लफ्रेड माहिका शर्मा काय काम करते आणि तिची नेटवर्थ किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज शोधणार आहोत… तर हार्दिक लक्झरी लाईफ जगतो…त्याचं गुजरातमधील वडोदरा येथे आलिशान पेन्टहाऊस आहे…ज्यात खाजगी जीम, होम थिएटर आणि इतर अत्याधुनिक सोयीसुविधा असल्याची माहिती आहे…तर त्याच्याकडे मुंबई अपार्टमेंट असून त्याची किंमत 30 कोटी रुपये असल्याची म्हटलं जातं…

माहिकाने दिग्गज फॅशन डिझाइनर्ससाठी केले रॅम्प वॉक

हार्दिक पांड्याकडे रोल्स रॉयस फॅन्तम, लॅम्बोर्गिनी हुराकान इव्हो, लॅम्बोर्गिनी उरूस एसई, मर्सिडीज-एएमजी जी 63, अशा महागड्या आणि अलिशान कारचं कलेक्शन आहे…त्याची सध्या 2026 मध्ये 95 कोटी ते 110 कोटी रुपये संपत्ती असल्याची माहिती आहे…हार्दिक क्रिकेट, जाहिराती आणि बिझनेसमधून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावतो… आता आपण त्याची गर्लफ्रेंड माहिका काय काम करत हे पाहूयात…माहिका शर्मा हे भारतीय फॅशन इंडस्ट्रीमधील एक ओळखीचं नाव आहे…तिने मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, रितू कुमार आणि तरुण तहलियानी यांसारख्या भारतातील दिग्गज फॅशन डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे…तिला 2024 मध्ये ‘इंडियन फॅशन अवॉर्ड्स’मध्ये ‘मॉडेल ऑफ द इयर ‘ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे..माहिकाने विवेक ओबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात एक लहान भूमिका स्विकारली होती..

माहिका जाहिरातीतून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावते

आता 2026 च्या आकडेवारीनुसार माहिकाची एकूण संपत्ती जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये असल्याची माहिती आहे…माहिका जाहिरातीतून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावते…तसेच ती फॅशन शो, शुट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कमाई करते…मात्र सध्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड माहिका सोबत लग्न करणार का अशी चर्चा सुरु आहे…कारण हार्दिकने 2026 च्या T20 विश्वचषक विजयानंतर माहिकाला आपली ‘लकी चार्म’ आणि ‘मेरी मिसेस’ असे म्हटले आहे…

दोन वेळा लग्न करुनही नताशा आणि हार्दिकचं लग्न 4 वर्ष टिकलं

हार्दिकने 31 मे 2020 रोजी लॉकडाऊन दरम्यान अत्यंत साधेपणाने पूर्व पत्नी नताशा स्टॅन्कोविक कोर्ट मॅरेज केले…यानंतर हार्दिकने पुन्हा नताशासोबत हिंदू आणि ख्रिशन अशा दोन्ही पद्धतीने लग्नाच्या तीन वर्षानंतर 14 फेब्रुवारी 2023 रोजी उदयपूरमध्ये शाही विवाह केला…मात्र दोन वेळा लग्न करुनही नताशा आणि हार्दिकचं लग्न केवळ 4 वर्ष टिकलं…18 जुलै 2024 रोजी हार्दिक आणि नताशाने वेगळे होत असल्याची घोषणा केली…सध्या दोघांना अगस्त नावाचा मुलगा असून त्याचा घटस्फोटानंतर दोघे मिळून सांभाळ करतात…या सर्व प्रकरणानंतर आता हार्दिक माहिका सोबत लग्न करेल याची शक्यता खूप कमी आहे…मात्र हार्दिकने माहिकाला लक असल्याचे म्हटले आहे..त्यामूळे हार्दिक पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकू शकतो, असे म्हटले जाते…आतापर्यंत महेंद्र सिंग धोनी, सचिन तेंडूलकर यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले…मात्र अद्यापही हार्दिकची जेवढी चर्चा झाली, तेवढी चर्चा कोणत्याची क्रिकेटपटूची झाली नाही…

हार्दिक पांड्या चर्चेत कमी आणि वादात जास्त

पण चर्चा होणं आणि वादात सापडणं वेगळं हो…हार्दिक पांड्या चर्चेत कमी आणि वादात जास्त राहिलाय…आधी एकदा करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल गेले होते, त्यानंतर हार्दिक पांड्यानं तिथं जी वक्तव्ये केली, त्यावरून रान पेटलं होतं, हार्दिक पाड्यानं फक्त त्याचीच नाही तर टीम इंडियाची पोलखोल या मुलाखतीत केली होती, त्यानंतर ही मुलाखत डिलीट करण्यात आली होती, आता एवढं झाल्यावर तरी हार्दिक पांड्या सुधारेल वाटलं होतं, मात्र तसं काही केल्या झालं नाही…

हार्दिकनं आपल्या खेळासोबत हेही सांभाळलं पाहिजे

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स कर्णाधार बनवल्यानंतर 5 वेळा ट्रॉफी जिंकूण देणाऱ्या रोहित शर्माला ज्या पद्धतीनं हार्दिक फिल्डिंगसाठी सूचना करत होता, त्यावरूनही हार्दिकवर बरीच टीका झाली, त्याला फॅन्सच्या ट्रोलिंगचा आणि उद्रेकाचा सामना करावा लागला होता, तरीही हार्दिक काही केल्या सुधारत नाही…हार्दिकला बघून याच ओळी आठवतात…जो खानदानी रईस है..वो मिजाज रखते है नरम अपना… तुम्हारा लहेजा बता रहा है…तुम्हारी दौलत नई नई है…त्यामुळे हार्दिकनं आपल्या खेळासोबत हेही सांभाळलं पाहिजे..काण टॅलेंट तर सचिन आणि विनोद कांबळी दोघातही होतं, मात्र एक त्याच्या टॅलेंटमुळे तसेच संयम आणि नम्रतेमुळे क्रिकेटचा देव बनवलं…तर दुसऱ्याला क्रिकेट विश्वातून आणि प्रसिद्धीतून गायब केलं…

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts