Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर…”, नितेश राणेंचा थेट इशारा, लव्ह जिहादबाबत केलं मोठं वक्तव्य
Top News

“कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर…”, नितेश राणेंचा थेट इशारा, लव्ह जिहादबाबत केलं मोठं वक्तव्य

Nitesh Rane | सध्या कुंभ मेळाव्याची (Kumbh Mela) जोरदार तयारी केली जात आहे. नाशिकमध्ये (Nashik) कुंभमेळा पार पडणार असून या कुंभमेळाव्यासाठी देशभरातली लाखो संत, साधू आणि भाविक उपस्थित राहणार आहेत. तर या कुंभमेळाव्याबाबत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा – कुलदीप यादव अडकला विवाहबंधनात; बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ

कुंभमेळ्याबाबत काय म्हणाले नितेश राणे?

नाशिकमध्ये हिंदू हित रक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सुचीचे प्रकाशन नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना नितेश राणेंनी कुंभमेळ्याबाबत मोठं वक्तव्य केलं. “कुंभमेळ्यात हिंदू सोडून जर कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका”, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे.

हिंदू लोकांनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. खारघरला मी अशीच भूमिका मांडली होती. खारघरमध्ये जिहादी लोकांची दुकाने होती तेव्हा त्यावर मी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मला माध्यमांनी झोड झोड झोडले होते. पण मला त्यावेळी काही वाटलं नाही आणि आताही काही वाटत नाही, असं नितेश राणे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, हिंदू राष्ट्रांमध्ये हिंदूंबाबत बोलायचं नाही तर मग काय पाकिस्तान, इस्लामाबादबाबत बोलायचं का? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला. आता रमजान सुरू आहे त्यामुळे त्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने लागली आहे. त्या दुकांनांमध्ये एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवा. एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही. कारण त्यांच्या कुराणमध्ये लिहिले आहे की, काफिरकडून काहीही घ्यायचं नाही. त्यामुळे ते लोक तसे वागतात. मग आपण करतो ते काय वेगळे आहे का? त्यामुळे कुंभमेळ्यात हिंदूंशिवाय कोणीही दुकाने लावायची नाहीत, असं नितेश राणे म्हणाले.

नितेश राणेंचं लव्ह जिहादबाबत मोठं वक्तव्य

कुराण मी दोनवेळा वाचले आहे. त्यामध्ये 10 टक्के जकात द्या, इतरांचा धर्म कमी करून आपला धर्म वाढवा, असं लिहिलं आहे. आपला पैसा लव्ह जिहादसाठी वापरला जातोय, असा आरोपही नितेश राणेंनी केली.

आमच्या राज्यात लव्ह जिहादचा कायदा सर्वात कडक असेल. आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच कुंभमेळ्यात लक्ष ठेवा, कोणी हिंदू सोडून स्टॉल लावला तर उखडून टाका. आम्ही मंत्रालयात बसलोच आहोत, असा इशारा देखील नितेश राणेंनी दिला.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts