pune mahaplika : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील (pahalgam attack) एका पीडिताची मुलगी असलेली आसावरी जगदाळे (asavari jagdale) हिला बुधवारी पुणे महापालिकेत (pune mahapalika) प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्या दहशतवादी हल्ल्यात तिने आपल्या वडिलांना गमावले होते. जवळपास ११ महिन्यांनी, तिला नोकरीचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले.उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला. या पत्रानुसार, तिची महापालिकेत ‘प्रशासकीय अधिकारी’ (Administrative Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, हे ‘वर्ग-२’ दर्जाचे पद आहे. आसावरीचे वडील संतोष जगदाळे (santosh jagdale) हे जे पुण्याचे रहिवासी होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील २६ मृतांमध्ये जगदाळे यांचा समावेश होता. त्यांचा मृत्यू गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगामच्या ‘बैसारन’ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात झाला होता.
हे ही वाचा: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरूच; तीन जण जागीच ठार
शिंदेनी दिलेले आश्वासन पूर्ण
एप्रिल २०२५ मधील पहलगाम हल्ल्यानंतर सरकारी नोकरीचे आश्वासन पूर्ण होण्यास विलंब झाल्याने आसावरी यांनी दाद मागितली होती. सामान्यतः महापालिका वर्ग-३ किंवा ४ ची पदे भरते, परंतु आसावरी यांच्या पात्रतेनुसार त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वर्ग-२ च्या पदाला मंजुरी देण्यात आली. पहलगाम पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगदाळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. पती गमावल्याने प्रगती जगदाळे आणि पिता गमावल्याने आसावरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देण्याचा निर्णय घेत सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते.ते आश्वासन त्यांनी पूर्ण केले.
आसावरी जगदाळे उच्च शिक्षित
आसावरी जगदाळे यांनी संगणक शास्त्रात पदवी आणि मानव संसाधन व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. उच्च शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन आसावरी हिला पुणे पालिकेत प्रशासकिय अधिकारी म्हणून निवड केली आहे. तसे शिंदे यांनी पुणे पालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
अनेकांनी केला होता पाठपुरावा
या प्रकरणाला गती मिळण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मेधा कुलकर्णी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जगदाळे कुटुंबाची व्यथा मांडली होती. तसेच माध्यमांनी या विषयाला वाचा फोडल्यानंतर सरकारने विशेष सक्रियता दाखवत हा निर्णय मार्गी लावला.












