Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

ICSE आणि ISC निकाल 2026 जाहीर; असा पाहा तुमचा निकाल लगेच

ICSE and ISC Result 2026: दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतंच ICSE आणि ISC चा निकाल जाहीर झाला असून ऑनलाईन निकाल कसा चेक करायचा, चला तर जाणून घेऊया.

CISCE म्हणजेच कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने आज ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ICSE (10 वी) आणि ISC (12 वी) परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.

आता विद्यार्थी आपले निकाल थेट अधिकृत वेबसाइट cisce.org वर किंवा DigiLocker अ‍ॅपवर पाहू शकतात. UID आणि Index Number टाकून तुम्ही सहज तुमचं मार्कशीट डाउनलोड करू शकता.

परीक्षा कधी झाल्या होत्या?

ICSE (10 वी) परीक्षा १७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान झाली होती.
ISC (12 वी) परीक्षा १२ फेब्रुवारी ते ३ एप्रिल या काळात पार पडली होती.

पास होण्यासाठी किती मार्क लागतात?

ICSE (10 वी): किमान 33% गुण लागतात
ISC (12 वी): किमान 35% गुण लागतात

निकाल कसा पाहायचा?

cisce.org या अधिकृत वेबसाइटवर जा
“ICSE Result 2026” किंवा “ISC Result 2026” या लिंकवर क्लिक करा
आपला कोर्स निवडा
UID, Index Number आणि Captcha भरा
“Show Result” वर क्लिक करा
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
तो डाउनलोड करून सेव्ह करा

DigiLocker वरून निकाल पाहण्याची सोपी पद्धत

वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक असल्यामुळे DigiLocker अ‍ॅप वापरूनही निकाल पाहता येतो. तिथे लॉगिन करून UID आणि Index Number टाकला की मार्कशीट लगेच दिसते.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts