भिवंडी हादरलं! 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, नराधमाने खाऊचे आमिष रूमवर बोलवले अन्…

Bhiwandi Crime: आरोपीने भाऊ-बहिणींना खाऊचे आमिष दाखवत रूमवर बोलावले. त्यानंतर मुलीच्या मोठ्या भावाला खाऊ आणि पाणी आणण्यासाठी बाहेर पाठवून दिले. यानंतर नराधमाने मुलीचे हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bhiwandi Crime :

भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात घडलेल्या धक्कदायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. इमारतीखाली खेळत असलेल्या ७ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी नारपोली पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला घटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी कशेळी येथील एका इमारतीखाली ७ वर्षीय मुलगी आपल्या १० वर्षीय भावासोबत खेळत होती. त्याचवेळी आरोपी अंकित गिरी (वय १८) तिथे आला. त्याने दोन्ही मुलांना खाऊचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने मुलाच्या हातात पैसे देऊन त्याला बाहेर पाठवले आणि मुलीला जवळच्या भाड्याच्या खोलीत नेले.

हेही वाचा: केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदलांची चर्चा; जाणून घ्या संपूर्ण अपडेट

आरोपानुसार, तिथे त्याने पीडित मुलीवर अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर मुलगी घरी परतली आणि तिने संपूर्ण प्रकार कुटूंबियांना सांगितला. यानंतर कुटूंबियांनी तात्काळ नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पोलीस उपयुक्त डॉ. पवन बनसोड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वात तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला आणि अवघ्या दोन तासांत अंकित गिरी याला अटक करण्यात आली.

Bhiwandi Crime : 7 वर्षीय मुलीवर अत्याचार

कशेळी परिसरात संतापाचे वातावरण

या घटनेनंतर कशेळी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर एकत्र येत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. तसेच अशा घटनांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण कायम आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top