Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST

About Us

LS मराठी (Lokshevay)

लोकशिवाय (Lokshevay) हे एक विश्वासार्ह मराठी डिजिटल न्यूज प्लॅटफाॅर्म असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहितकारी पत्रकारितेच्या मूल्यांवर कार्यरत आहे. “गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही… दाखवतं ते लोकशिवाय” या ब्रीदवाक्यासह आम्ही प्रत्येक बातमीचा सर्वांगीण आणि वस्तुनिष्ठ आढावा वाटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. 
लोकशिवायचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि नागरिकांच्या अचूक विश्वासार्ह व पडताळणी केलेली माहिती उपलब्ध करून देणे. आम्ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडींचे कखोल वृत्तांकन करतो.
 
LS MARATHI NEW LOGO scaled

आम्ही कोणत्या विषयांवर बातम्या देतो?

ताज्या घडामोडी (Breakig News)

राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घटना सर्वात आधी आणि अचूकतेने

राजकारण (POlitics)

महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणातील घडामोडी, विश्लेषण, निवडणुका आणि राजकीय रणनीती.

गुन्हे व कायदा

गुन्हेगारी प्रकरणे, तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर घडामोडी.

विशेष मुलाखती आणि विश्लेषण

घटनांच्या पलीकडे जाऊन सत्याचा शोध घेणारे विशेष रिपोर्ट्स आणि मुलाखती.

शेतकरी आणि ग्रामीण प्रश्न

शेतकरी, शेती, कर्जमाफी, बाजारभाव, ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रातील बदल.

व्यवसाय आणि अर्थकारण

उद्योग, रोजगार, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि उद्योजकतेशी संबंधित बातम्या.

क्रिडा

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वातील ताज्या अपडेट्स

मनोरंजन

चित्रपट, मालिका, वेब सीरीज, संगीत आणि सेलिब्रिटी विश्वातील घडामोडी..

आमची ओळख

लोकशिवाय हे मराठी भाषेतील एक आधुनिक, स्वतंत्र आणि लोकाभिमुख डिजिटल न्यूज प्लॅटफाॅर्म आहे. आम्ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय घटना, सामाजिक प्रश्न, शेतकरी समस्या, गुन्हेगारी, क्रिडा, मनोरंजन आणि जनसामान्यांसी निगडित विषयांवर विश्वासार्ह वृत्तांकन करतो. आमच्या प्रत्येक बातमीमागे सत्य शोधण्याची वृत्ती, पडताळणीची प्रक्रिया आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी असते. आम्ही केवळ घटना सांगत नाही, तर त्या घटनेमागील कारणे, परिणाम आणि वस्तुस्थिती वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.

आमचे ध्येय (OUR MISSION)

समाजातील प्रत्येक घनकार्यंत सत्य, अचूक आणि पडताळणी केलेली माहिती पोहोचवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.
आम्ही अशा पत्रकारितेवर विश्वास ठेवतो जी :
– सत्याला प्राधान्य देणे
– जनतेच्या प्रश्नांना आवाज देतो
– सत्तेला प्रश्न विचारते
– लोकशाही मूल्यांचे रक्षण करते
– समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणा देते

आमचे उद्दिष्ट्ये (OUR VISION)

मराठी भाषेतील सर्वाधिक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकाभिमुख डिजिटल न्यूज ब्रँड बनणे ही आमची उद्दिष्ट्ये आहेत.
आम्हाला अशी पत्रकारिता घडवायची आहे जी :
– प्रत्येक नागरिकाचा आवाज बनेल
– ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्नांना समान महत्त्व देईल
– तरुण पिढीला विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देईल
– समाजातील दुर्लक्षित घटनांना व्यासपीठ मिळवून देईल

आमची पत्रकारिता वेगळी का आहे?

आज अनेक माध्यमे केवळ वेगाला प्राध्यान्य देतात. मात्र लोकशिवाय चॅनेल वेगासोबत सत्य आणि विश्वासार्हतेलाही तितकेच महत्त्व देतो.

तथ्य पडताळणी..

प्रत्येक बातमी प्रकाशित करण्यापूर्वी तिची पडताळणी केली जाते.

निष्पक्ष वृत्तांकन..

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबावाशिवाय संतुलित बातम्या.

जनतेचा आवाज..

सामान्य नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांना व्यासपीठ

पारदर्शकता..

पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे काटेकोर पालन.

जबाबदार मीडिया..

समाजात सकारात्मक बदल घडवणारी आणि लोकहित जपणारी पत्रकारिता.

LS Marathi


आमची बांधिलकी

लोकशिवायची टीम सत्य, प्रामाणिकपणा आणि लोकहित या मूल्यांशी कटिबद्ध आहे. आण्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांचे प्रश्न समोर आणण्यासाठी, जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी आणि जबाबदार पत्रकारितेची परंपरा पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

लोकशिवाय – केवळ बातमी नाही, तर सत्याचा शोध!

आमचा प्रवास हा केवळ न्यूज पोर्टलचा प्रवास नाही; तो समाजाच्या प्रत्येक घटकाचा आवाज बनण्याचा आणि सत्याला नवी दिशा देण्याचा प्रवास आहे. लोकशिवाय – सत्याची नवी दिशा!


Ls मराठीच का?

कारण आम्ही केवळ बातम्या देत नाही,
तर त्या बातमीमागील सत्य, संदर्भ आणि परिणामही समोर आणतो. <br>आमचा विश्वास आहे की जबाबदार पत्रकारिता ही समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.
लोकशिवायसोबत जोडलेले राहा आणि सत्याचा नव्या दिशेचा भाग बना.
लोकशिवया- सत्याची नवी दिशा!