Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • जगन्नाथ पुरी रथयात्रेला आजपासून सुरुवात; रथाची दोरी ओढत भगवानांना कुठे नेलं जातं? जाणून घ्या यामागचं रहस्य
ताज्या बातम्या

जगन्नाथ पुरी रथयात्रेला आजपासून सुरुवात; रथाची दोरी ओढत भगवानांना कुठे नेलं जातं? जाणून घ्या यामागचं रहस्य

Jagannath Rath Yatra 2026
Jagannath Rath Yatra 2026: आज, १६ जुलै रोजी जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात झाली असून लाखो भाविक या भव्य सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना भव्य रथांमध्ये विराजमान करून नेमकं कुठे नेलं जातं, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. चला, जाणून घेऊया या परंपरेमागील धार्मिक महत्त्व आणि त्यामागचं खरं कारण.

ओडिशातील पुरी (Odisha Puri) येथे आज (१६ जुलै) भगवान जगन्नाथांच्या भव्य रथयात्रेला (Jagannath Rath Yatra 2026) प्रारंभ झाला आहे. आषाढ शुल्क द्वितीयेला सुरू होणारा हा उत्सव हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन धार्मिक परंपरांपैकी एक मानला जातो. दरवर्षी लाखो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहून भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनाचा (Jagannath Temple) लाभ घेतात.

हेहा वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार

भगवान जगन्नाथ रथातून नेमकं कुठे जातात?

रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ (Lord Jagannath), त्यांचे मोठे बंधू भगवान बालभद्र (Lord Balabhadra) आणि बहीण देवी सुभद्रा (Goddess Subhadra) हे तीन स्वतंत्र रथांमधून मुख्य मंदिरातून गुंडिचा मंदिराकडे प्रस्थान करतात. धार्मिक मान्यतेनुसार, गुंडिचा मंदिर हे भगवानांच्या मावशीचे घर मानले जाते. दरवर्षी भगवान आपल्या भक्तांच्या भेटीसाठी मंदिराबाहेर येतात आणि काही दिवस गुंडिचा मंदिरात मुक्काम करतात.

रथयात्रेचे धार्मिक महत्त्व

जगन्नाथ रथयात्रा ही केवळ एक धार्मिक मिरवणूक नसून समानता, भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा उत्सव आहे. या दिवशी भगवान स्वतः मंदिराबाहेर येऊन सर्व भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे मंदिरात प्रवेश न मिळणाऱ्या भाविकांनाही भगवानांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. ही परंपरा सर्वसमावेशकतेचे प्रतीक मानली जाते.

रथाची दोरी ओढण्यामागील श्रद्धा

रथयात्रेतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे भगवानांच्या रथाची दोरी ओढणे. धार्मिक श्रद्धेनुसार, रथाची दोरी ओढल्याने पुण्य प्राप्त होते, पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे लाखो भाविक या सेवेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात.

हा उत्सव किती दिवस चालतो?

रथयात्रेनंतर भगवान गुंडिचा मंदिरात काही दिवस वास्तव करतात. त्यानंतर २४ जुलै रोजी बाहुडा यात्रा काढली जाते, ज्यामुळे भगवान पुन्हा श्रीमंदिरात परततात. त्यानंतर 27 जुलै रोजी होणाऱ्या नीलाद्री बीजे या धार्मिक विधीसह रथयात्रा उत्सवाची सांगता होते.

जगन्नाथ पुरी रथयात्रा ही श्रद्धा आणि परंपरा यांचा सुंदर संगम मानली जाते. देशभरातील आणि विदेशातील लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होत भगवान जगन्नाथांच्या (Jagannath Rath Yatra 2026) दर्शनाचा लाभ घेतात.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts