जळगाव जिल्हा पोलीस दलातील 63 दुचाकी वाहनांचे व अग्निशमन दलाच्या 6 मिनी फायर व्हॅनचे प्रजासत्ताक दिनी रविवारी 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आली. संकट समय व अत्यावश्यक प्रसंगी पोलीस व अग्निशमन दलाची यंत्रणा तातडीने पोहोचावी यासाठी जिल्हा पोलीस दलात 63 दुचाकींचा समावेश करण्यात आला असून सोबतच अग्निशमन दलाच्या वतीने ही 6 मिनी फायर व्हॅनचा अग्निशमन दलात समावेश केला आहे. त्यामुळे आवश्यक व अवघड ठिकाणी नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार असल्याचे मत यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केले.












