अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातावर अनेक माध्यमांनी चुकीच्या आणि अपूर्ण बातम्यांचा प्रसार केल्याने, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
AAIB ने स्पष्टपणे सांगितले आहे की, तपास पूर्ण होण्याआधी कोणत्याही प्रकारचे निष्कर्ष, अंदाज किंवा दोषारोप करू नयेत. अशा अप्रमाणित बातम्यांमुळे समाजात गैरसमज पसरतात आणि अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो, असेही संस्थेने म्हटले आहे.
संस्थेने माध्यमांना जबाबदारीने आणि अधिकृत स्रोतांवर आधारित माहितीच प्रसिद्ध करण्याचं आवाहन केलं आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल जाहीर केला जाईल, आणि तोपर्यंत संयम बाळगावा, अशी विनंती AAIB ने केली आहे.