Zodiac-Auspicious-Planets-Oct-Nov 2025 : ऑक्टोबर महिना संपायला काही दिवस बाकी असून लवकरच नवीन महिना म्हणजे नोव्हेंबर महिना सुरु होणार आहे. ऑक्टोबर महिन्यातला शेवटचा आठवडा आता सुरु होणार आहे. हा आठवडा बऱ्याच शुभ ग्रहांचा आहे. या शुभ ग्रहांचे शुभ संयोग तयार होत असून हा आठवडा अनेक गोष्टींसाठी चांगला असणार आहे. एवढेच नाही तर नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा देखील काही राशिंसाठी शुभ, लाभदायी ठरणार आहे. या राशींमध्ये तुमचाही सहभाग आहे का ? जाणून घेऊया या लेखात.
मेष
मेष या राशीसाठी ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा आठवडा सकारात्मक असणार आहे. या आठवड्यात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन कार्यांमध्ये तुमचे मन रमेल. या आठवड्यात तुम्ही मानसिक शांतीसाठी फिरण्याचा प्लान करू शकतात. नवीन गोष्टी करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल, या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ राशीसाठी नोव्हेंबर महिन्यातील नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. तसेच या आठवड्यात तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा गुंतवणुकीसाठी लाभदायी ठरेल.
मिथुन
मिथुन राशीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनेक बदल बघायला मिळू शकतात. मिथुन राशीच्या विद्यार्थी वर्गात प्रगती दिसून येईल. मित्रांच्या सहकार्याने तूम्हाला तुमची कामे पूर्ण करता येऊ शकतात. या आठवड्यात मानसिक शांतीसाठी योग आणि व्यायाम करण्याची गरज भासेल. एकंदरीत नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आठवड्याची सुरुवात अनुकूल असेल. या व्यक्तींच्या आयुष्यात आर्थिक स्थितीत सुधारणा पाहायला मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही एक छोटी गुंतवणूक केली तर तुमच्यासाठी हि गुंतवणूक लाभदायी ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्यात सुधारणा जाणवेल.
सिंह
सिंह राशीसाठी नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा भाग्यदायी असणार आहे. या राशींच्या व्यक्तीच्या आयुष्यावर ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ परिणाम जाणवेल. आत्मविश्वासात चांगली गती निर्माण झालेली दिसेल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल.
कन्या
कन्या राशीसाठी नोव्हेंबर महिन्यातील आठवड्याची सुरुवात चांगली जाईल. या राशीच्या व्यक्तींच्या नशिबाची साथ चांगली राहील. मात्र आठवड्याच्या शेवटी अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. या काळात स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमच्या कार्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे. प्रयत्न करत राहा.








