Tulsi Vivah Venus transit Malavya Rajyoga : कार्तिक महिनेच्या शुक्ल पक्षाच्या द्वादश तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. यंदा हिंदू पंचांगानुसार 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. यंदा तुळशी विवाह ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण याच दिवशी शुक्र ग्रहाचे संक्रमण होणार असून या दिवशी तूळ राशीमध्ये शुक्र ग्रह असणार आहे. शुक्र ग्रह हा तूळ राशी मध्ये असल्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. म्हणजे या तुळशी विवाहाच्या दिवशी कोणत्या राशींना शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा लाभ होईल.
ज्योतिष शास्त्रानुसार प्रेम भौतिक सुख ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह हा संक्रमण करणार आहे. त्यामुळे विशिष्ट स्थितीमुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. जेव्हा शुक्र ग्रह स्वतःच्या राशीमध्ये म्हणजेच ऋषभ किंवा तूळ राशीमध्ये किंवा उच्च राशी मध्ये म्हणजेच मीन राशि मध्ये असतो तेव्हा हा राजयोग तयार होतो. या व्यक्तींच्या कुंडलीत हा योग तयार होतो त्यांच्यावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते. मग जाणून घेऊया तुमच्या राशीवर आहे का लक्ष्मी मातेचा हात.
कन्या
कन्या राशि मध्ये शुक्र ग्रहाचे संक्रमण होणार आहे. या राशीसाठी हे शुक्र ग्रहाचे संक्रमण लाभदायक ठरणार असून याच दिवशी तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण झालेला दिसेल. तुम्ही शुभ निर्णय घेऊ शकतात. तुमची दैनंदिन आयुष्यात सुख शांती आणि समाधानकारक नांदेल.
तूळ
तूळ राशीसाठी शुक्र ग्रहाचे संक्रमण लाभदायी ठरणार असून या काळात जुने गैरसमज दूर होतील. तुम्ही एखाद्या वस्तूची खरेदी करू शकतात. तुमच्या घरा सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तुमचं घर आणि करिअर दोघांमध्ये स्थिरता दिसून येईल.
मीन (Tulsi Vivah Venus transit Malavya Rajyoga)
मीन राशि मध्ये शुक्र ग्रहाचं संक्रमण भाग्यशाली असणार आहे. या काळामध्ये प्रवासाचे योग जुळून येत आहेत. तुम्हाला नवीन अनुभव मिळतील त्या अनुभवांतून खूप काही शिकता येईल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. या काळात रखडलेली कामे पूर्ण होतील.










