Venus transit Sagittarius 2025 : तब्बल 12 वर्षांनी अतिशय अप्रतिम असा गुढ ग्रहयोग जुळून येत आहे. हा योग काही राशींच्या आयुष्यात अविश्वसनीय बदल आणि जादू घेऊन येणार आहे. 2025 या वर्षाच्या शेवटी काही राशीतील लोकांना धन, संपत्ती, ऐश्वर्य, आयुष्यात समाधान यासारखे प्रभावी लाभ मिळणार असल्याचे मत आहे. जाणून घेऊया या राशींमध्ये तुमच्याही राशीचे नाव आहे का ?
ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे 12 प्रकार पडतात. या 12 राशींवर ग्रह परिवर्तन, ग्रोचर यासारख्या बाबींचा प्रभाव प्रखरपणे दिसून येतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ देखील जाणवत असतो. त्यामुळे प्रत्येक राशींच्या भविष्यवाणीवर शुभ अशुभ प्रभाव पडल्याचे जाणवते. त्यानुसार काही राशींच्या आयुष्यात शुक्राची कृपा पाहायला मिळणार आहे. शुक्र हा ग्रह जीवनात वैभव, ऐश्वर्य, धन-संपत्ती, भौतिक सुख आणतो. हा ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो. म्हणून जेव्हा या ग्रहाच्या चाळीमध्ये परिवर्तन होते तेव्हा काही बाबींवर त्याचा प्रभाव दिसून येतो. यंदाही वर्षाच्या अखेरीस काही राशींवर हा प्रभाव दिसणार आहे.
डिसेंबर महिन्यात शुक्र हा ग्रह धनु राशींमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींवर याचा परिणाम दिसून येईल. खास करून डिसेंबर महिन्यात शुक्राची 3 राशींवर कृपा असणार आहे. या राशींमध्ये तुमचा तर सहभाग नाही ना ? जाणून घेऊया
मेष
डिसेंबर महिनाय्त शुक्राचे परिवर्तन धनु राशीत होणार आहे. हे परिवर्तन अत्यंत शुभ मानले जात आहे. त्यानुसार शुक्र ग्रह मेष राशीच्या कुंडलीतील नवव्या चरणात संक्रमण करणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींलंका नशिबाची चान्गली साथ लाभेल. या काळात तुमची रखडलेली संपूर्ण कामे पूर्ण होतील. तुमचा व्यवसाय या काळात विस्तारित होण्याची शक्यता आहे. तुम्ही काही सरकारी योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करू शकतात.
धनु (Venus transit Sagittarius 2025)
या राशीसाठी शुक्र ग्रहाचे परिवर्तन अतिशय अनुकूल असणार आहे. कारण या राशीत शुक्र ग्रह प्रथम स्थानी संक्रमण करत आहे. यामुळे कार्यात चांगली प्रगती होईल. या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. या राशींच्या जीवनात या काळात प्रवास होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर तुमच्या हातून घर, वाहन किंवा प्रॉपर्टीची खरेदी होऊ शकते. खरेदीसाठी हा काळ शुभ असणार आहे.
मीन
मिन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचे परिवर्तन भाग्यशाली ठरणार आहे. कारण या काळात या राशींच्या व्यक्तीच्या कामकाज विस्तार वाढण्याची शक्यता आहे. या राशीतील व्यक्तींना या काळात प्रवासाचे योग आहेत. तुमच्या हातातून एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. तुम्ही केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. यासह नोकरदार वर्गात प्रोमोशन होण्याचीही दाट शक्यता आहे.







