Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • तुम्ही BSNL वापरकर्ते आहात का ? मग तुमच्यासाठी बीएसएनएलने आणली आहे ही खास ऑफर
बिजनेस

तुम्ही BSNL वापरकर्ते आहात का ? मग तुमच्यासाठी बीएसएनएलने आणली आहे ही खास ऑफर

BSNL special offer for users : सध्या मार्केटमध्ये जिओ, एअरटेलने धुमाकूळ घातला आहे. महागड्या रीचार्जमुळे ग्राहकांमध्ये तारांबळ उडत आहे. अशातच आता बीएसएनएलने या शर्यतीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांसाठी दोन आकर्षक आणि प्रिपेड प्लान सादर केले आहे. आजच्या या लेखात जाणून घेऊया काय आहे हा बीएसएनएलचा रीचार्ज प्लान.

सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी BSNLने त्यांच्या ग्राहकांसाठी आणि एअरटेल जिओला टक्कर देण्यासाठी धमकेदार प्लान सादर केला आहे. या प्लानमुळे महागड्या रीचार्ज प्लानची सुट्टी होणार आहे. टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने संपूर्ण वर्षभराचा प्लान ग्राहकांसाठी सादर केला. त्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह ग्राहकांना विविध सुविधा देण्यात येणार आहेत.

 

बीएसएनएलचा वार्षिक प्लान

बीएसएनएल या टेलिकॉम कंपनीने सर्वात मोठा प्लान सादर केला आहे. यानुसार तुम्हाला 1 वर्षांसाठी 2 हजार 399 रुपयांचा वार्षिक प्लान सादर करण्यात आला आहे. या प्लानमुळे तुमचे 1000 ते 15000 रुपये वाचतील. हा रीचार्ज प्लान घेतल्यास तुम्हाला वर्षभर रीचार्ज करायची गरज भासणार नाही. हा प्लान 365 दिवसांसाठी म्हणजे वर्षभर सुरू राहणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 GB ही स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, 100 एसएमएस, यासह BiTV या सेवेच्या लाभ मिळणार आहे. या रीचार्ज ऑफर मध्ये तुम्हाला 350 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि बरेच OTT App चा समावेश असणार आहे.

हे ही वाचा : 1 डिसेंबर पूर्वी करा हे काम; 1 डिसेंबर पासून नियमात होणार हे महत्वाचे 5 बदल

347 रुपयांचा प्लान

एक वर्षासाठी valid असलेल्या या प्लानसोबत BSNL कंपनीने 50 दिवसांचा आकर्षक प्लान देखील बाजारपेठेत सादर केला आहे. या प्लान ची किंमत 347 रुपये आहे. म्हणजे तुम्ही 50 दिवस हा प्लान वापरू शकतात. यामध्ये तुम्हाला दररोज २ GB
हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 100 मोफत एसएमएस पॅक सह संपूर्ण भारतात मोफत नॅशनल रोमिंग मिळेल. एवढेच नाही तर तुम्ही बीएसएनएल च्या अधिकृत वेबसाइट किंवा सेल्फ-केअर ॲपवरून रिचार्ज केल्यास तुम्हाला 5% अतिरिक्त सूट मिळू शकते.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts