भारतातील आर्थिक गुंतवणूक म्हणजे सोने खरेदी. ही एक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. सध्या सोन्याचा भाव गगनाला भिडले असले तरीही सांस्कृतिक आणि आर्थिक परंपरेनुसार सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे हे काही थांबण्यासारखे नाही..! ते ही खास करून धनतेरस, विवाहसमारंभ, दसरा या सणाला. तुम्ही देखील धनतेरसला सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल आणि गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल, परंतु सोन्याच्या वाढलेल्या भावाने परेशान असाल तर जाणून घ्या धनतेरस पर्यंत सोने खरेदी करण्याची ट्रिक आणि फायदे.
सोने हे संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. बरेच जण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे वळतात. दिवाळीची सुरुवात होते ती म्हणजे धनतेरस सणाने. धनतेरस हा भारतातील अत्यंत शुभ आणि ऐतिहासिक सण मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे ही परंपरा आहे. कारण या दिवशी सोने खरेदी केल्यास घरात लक्ष्मीची कृपा राहते. आणि संपन्नतेची निर्मिती होते. भारतात सोने म्हणजे फक्त दागिना किंवा शोभेचा भाग नसून तो आर्थिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही महत्त्वपूर्ण आहे.
या ट्रिक्स वापरून खरेदी करा सोने, गुंतवणूक ही होईल आणि हौस देखील
1. धनतेरसपूर्वी सोने खरेदी करा
सणासुदीच्या काळात सोने खरेदीची मागणी जास्त असते. त्यानुषंगाने सोन्याचे भाव सणासुदीच्या काळात प्रचंड वाढतात. धनतेरसपूर्वी सोने खरेदी करणे बऱ्याच कारणांनी उपयुक्त आहे. म्हणून सणासुदीपूर्वी सोने खरेदी केल्यास कमी दरात सोने खरेदी करता येते. एवढेच नाही तर सणासुदीपूर्वी खरेदी केल्यास आपल्या आवडत्या ज्वेलर्सकडे होणारी गर्दी टळते, आरामात खरेदीही करता येते आणि ज्वेलर्स असंख्य डिझाईन, नाणी दाखवितात. एवढंच नाही तर सणासुदीपूर्वी सोने खरेदी केल्यामुळे हॉलमार्क, शुद्धता आणि बिलिंगवेळी होणारी धावपळ टाळता येते, आणि शेवटच्या क्षणी घाई होत नाही.
2. डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करा
जर तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन सोने खरेदी करता येणार नसेल आणि तुम्ही गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर गोल्ड खरेदी करू इच्छित असाल तर डिजिटल गोल्ड मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणुकीसाठी महत्वपूर्ण ट्रिक्स आहे. त्यानुसार तुम्ही Google Pay, PhonePe किंवा Paytm च्या माध्यमातून डिजिटल गोल्ड खरेदी करू शकतात. ही गुंतवणूक सुरक्षित असून तुम्ही कमीत कमी रकमेतून सुरुवात करू शकतात.
3. ऑफरचा फायदा घेऊन खरेदी करा गोल्ड
दिवाळीत धनतेरसला सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा प्रचंड कल असतो. तसेच विविध ज्वेलरी शॉप वर सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर ऑफर लावल्या जातात. जसे कि, मेकिंग चार्ज वर सवलत, cashback, EMI ऑफर. त्यानुसार तुम्ही ऑफर चा फायदा घेऊन गुंतवणूक करू शकतात.
4. बजेटनुसार खरेदी करा सोने
सोन्याचे भाव प्रचंड वाढलेले आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 12 लाख 83 हजार 500 आहे. तर 22 कॅरेट चा भाव 11 लाख 76 हजार 500 आणि 18 कॅरेट चा भाव 9 लाख 62 हजार 600 आहे. पण तरीही तुम्ही सोने खरेदी करू इच्छित असाल तर तुमचे बजेट हे महत्वपूर्ण आहे. आजच्या सोन्याच्या भावानुसार तुमचे सोने खरेदीचे बजेट 10 हजार पेक्षा कमी असेल तर तुम्ही 18 कॅरेट गोल्ड मध्ये 1 ग्राम गोल्ड खरेदी करू शकतात. जर तुमचे बजेट 12 हजार पेक्षा कमी असेल तर तुम्ही 22 कॅरेट मध्ये 1 ग्राम गोल्ड खरेदी करू शकतात. आणि तुमचे बजेट आजच्या सोन्याच्या किमतीनुसार 13 हजार पर्यंत असेल तर तुम्ही 24 कॅरेट गोल्ड मध्ये 1 ग्राम गोल्ड खरेदी करू शकतात. जर तुमचे बजेट यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 1 तोळा गोल्ड घेण्यापेक्षा 2 ग्राम, 5 ग्राम , 8 ग्राम गोल्ड खरेदी करू शकतात.