दिवाळी काही दिवसांवर असताना केंद्र सरकारने EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कारण पीएफ अकाउंट मधून 100 टक्के रक्कम काढता येणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी कर्मचाऱ्यांना पीएफ अकाउंट मधून संपूर्ण रक्कम पीएफ अकाउंट मधून काढता येत नव्हती. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजी होती. यासह पीएफ अकाउंट मधून पैसे काढायचे असल्यास तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देऊन देखील हवी तेवढी रक्कम मिळत नव्हती. परंतु आता असे न होता तुम्हाला संपूर्ण रक्कम काढता येणार आहे.
पीएफ अकाउंट मधून यापूर्वी पैसे काढण्यासाठी 13 नियम लागू करण्यात आले होते. परंतु आता पीएफ अकाउंटचे नियम बदलण्यात आले असून तीन विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे. म्हणजे पैसे काढण्यासाठी आजारपण, शिक्षण आणि विवाह असे तीन विभाग करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने तुम्ही पीएफ अकाऊंटमधून रक्कम काढू शकतात.
या कारणासाठी इतक्या वेळा काढता येणार पैसे
पीएफ अकाउंट वरून तुम्ही आवश्यक गरजांसाठी म्हणजेच शिक्षण, विवाह, वैद्यकीय कारण यासाठी पैसे काढू शकतात. यापैकी तुम्ही शिक्षणासाठी दहा वेळा तर लग्नासाठी 5 वेळा रक्कम काढू शकतात. तसेच गृहसंबंधित गरज, विशेष परिस्थितीत देखील तुम्ही हि रक्कम काढू शकतात. तसेच हे दावे लगेच मंजूर केले जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
हे हि वाचा : टाटा समुहानं एन चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवला; ऐतिहासिक निर्णयासाठी बदलला नियम
आगाऊ रक्कम काढण्याच्या मुदतीत बदल
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आगाऊ रक्कम काढण्यासाठीच्या मुदतीत देखील बदल केले आहे. त्यानुसार भविष्य निधीच्या परिपक्वतेपूर्वी रक्कम काढण्याची मुदत 2 महिन्यांवरून 12 महिन्यांवर तर अंतिम पेन्शन काढण्याची मुदत 2 महिन्यांवरून 36 महिने एवढी वाढवण्यात आली आहे. या नवीन सुधारित नियमांमुळे पेन्शन हक्कांमध्ये कोणतीही तडजोड न करता तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे.
सध्या EPFO कडून सदस्यांना 8.25 टक्के व्याजदर दिला जातो. लवकरच आता EPFO चे एटीएम आणि युपीआयने देखील काढता येणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने काढता येणार पीएफ चे पैसे
सर्वात अगोदर EPFO पोर्टलवर लॉग इन करा. त्यानंतर UAN आणि पासवर्ड वापरून EPFO e-SEWA पोर्टलवर लॉग इन करा. त्यानंतर ‘ऑनलाइन सेवा’ निवडा. आणि त्यानंतर ‘दावा (फॉर्म-31, 19, 10C आणि 10D)’ वर क्लिक करा. तसेच बँक तपशील सत्यापित करा. तुमचा UAN शी लिंक केलेला बँक खाते क्रमांक प्रविष्ट करून तपशील सत्यापित करा.