कल्याणमध्ये गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वी फुलांचे भाव वाढले आहे. बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली असून फुलांचे दर दुप्पट झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. या फुलांमध्ये झेंडू, शेवंती, गुलाब अशा सर्व फुलांच्या किमती वाढल्या असून शंभर रुपयांचा झेंडू आता दोनशे रुपयांना, तर शेवंती तीनशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पावसामुळे ओल्या फुलांची मागणी घटल्याने व्यापारीही नाराज झाले आहे.












