भारतात गोल्ड खरेदी करणे हे शुभ मानल्या जाते. खासकरून दिवाळी या सणानिमित्त सोने खरेदीकडे नागरिकांचा कल जास्त असतो. सोने खरेदी हे भारतीय संस्कृतीत फक्त दागिना नसून संपत्ती, परंपरेचे प्रतीक आहे. सध्या सोन्याने सव्वा लाखाचा आकडा गाठला असून चांदीचे दर देखील गगनाला भिडले आहे. काही दिवसांनी दिवाळी असून ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने खरेदीदारांमध्ये नाराजी दिसत आहे. अशातच तुम्ही सोने खरेदीकडे एक गुंतवणूक म्हणून वळत असाल . तर इन्व्हेस्टमेंट चे अजूनही काही पर्याय उपलब्ध आहे.
तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर शेअर बाजार हा एक पर्याय उपलब्ध आहे. शेअर मार्केटमध्ये बऱ्याच अशा कंपन्या आहेत ज्या सोनं खरेदी आणि विक्री करत असतात. तुम्ही त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकतात. परंतु शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे हे बऱ्याचदा रिस्की असते. त्यातून दुप्पट रिटर्न मिळतो. इन्व्हेस्टमेंट करत असताना इन्वेस्टरला वाटत असतं की आपण गुंतवलेले पैसे दुप्पट व्हावे पण बऱ्याचदा तोटा होतो, तर बऱ्याचदा पैसे दुप्पट देखील होतात. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
सोने खरेदी करणे आणि घेणे हा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यामध्ये Titan compani, kalyan jwellers India, PC jweller, Rajesh Export, senco Gold या कंपन्या गोल्ड संबंधित व्यवसाय करतात. याशिवाय, गोल्ड मार्केटशी संबंधित इतर मोठ्या कंपन्यांमध्ये Malabar Gold & Diamonds, Tanishq, Joyalukkas, Tribhovandas Bhimji Zaveri (TBZ) आणि GRT Jewellers यांचा समावेश आहे. या कंपन्या फक्त दागिने विकण्यापुरता मर्यादित नसून सोन्याचे उत्पादन, निर्यात, डिजाईन, डिजिटल गोल्ड या गुंतवणुकीच्या सुविधा देखील देतात. सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाल्यास थेट परिणाम या कंपन्यांवर देखील होतो. म्हणून गुंतवणूकदारांसाठी कंपन्यांचे शेअर्स आकर्षक ठरतात.
सोन्याचे भाव बऱ्याचदा कमी जास्त होत असतात. यामुळे या व्यवसायासोबत जोडलेल्या कंपन्यांना याचा प्रचंड फायदा होतो. कोणत्या कंपन्यांच्या शेअर मध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील हे ठरवण्यासाठी तुम्हाला रिसर्च करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बिझनेस मॉडेल आणि रिकॉर्ड तुम्हाला मदत करू शकते.