Gold and silver prices today : गेले काही महिने सोने चांदीचे भाव गगनाला भिडले होते. आता सोने–चांदीच्या भावात चढ उतार पाहायला मिळत आहे. सध्या सोने चांदी स्वस्थ झाले असून तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करून तुमचा फायदा करून घेऊ शकतात. कारण सोने कधी उचांकी गाठेल आणि त्याची किंमत वाढेल सांगता येत नाही. जाणून घेऊया आजचा सोने आणि चांदीचा दर.
भारतात सध्या सोने चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसत आहे. ही ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. सध्या लग्नसराई सुरु असून दागिन्यांच्या खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी दिसून येत आहे. आज 24 करत शुद्ध सोन्याचा भाव 10 ग्राम साठी 1 लाख 31 हजार 325 रुपये एवढी आहे. म्हणजेच 1 ग्राम साठी तुम्हाला 13 हजार रुपये मोजावे लागतील. कालच्या तुलनेत आज 500 रुपयांनी घसरण झाली आहे.
हे ही वाचा : मोबाईलमध्ये संचार सारथी ऍप प्री इन्स्टॉलेशन आता अनिवार्य; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय
सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1 लाख 20 हजार 200 रुपये आहे. तर 1 ग्रॅम साठी 12000 रुपये एवढा आहे. तर आता 18 कॅरेट गोल्ड ची किंमत 10 ग्राम साठी 97 हजार 780 एवढी आहे. तर 1 ग्रॅम्स नाही हि किंमत 9 हजार 778 रुपये आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या दारात देखील आज घसरण झाली आहे. सध्या जीएसटीसह चांदीचे दर 1 लाख 83 हजार 340 एवढे आहे. यापूर्वी चांदीचे भाव देखील प्रचंड वाढले होते. आता चांदी स्वस्त होताना दिसत आहे. आता तुम्ही कमी किमतीत चांदीच्या वस्तू खरेदी करू शकतात.












