government scheme higher returns than FD – आपण बऱ्याचदा फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवत असतो. पण त्यापेक्षा जास्त फायदेशीर असलेल्या सरकारी योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? एनएससी म्हणजेच नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही अशी योजना आहे ज्यामध्ये फिक्स डिपॉझिट च्या तुलनेमध्ये जास्त व्याज आणि सुरक्षित गुंतवणुकीची हमी देखील देण्यात येते. त्याचबरोबर यावर भरण्यात येणारा टॅक्स मध्ये सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो.
या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये भरावे लागतात. त्यानंतर गुंतवणुकीवर 6.8% व्याजदर देण्यात येते. हे खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर उघडता येते त्याचबरोबर या योजनेमध्ये जॉईन खाते उघडण्याची सुद्धा सुविधा आहे. यासाठी मॅच्युरिटी कालावधी आणि लॉक इन कालावधी सुद्धा पाच वर्षाचा देण्यात आलेला आहे. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट मध्ये जमा करण्यात आलेल्या या रकमेला कायद्याअंतर्गत 1961 च्या कलम 80 c अंतर्गत सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या किमतीवर दीड लाख रुपये पर्यंतची आयकर सूट मिळवण्यासाठी दावा करू शकतात. त्याचबरोबर पाच वर्षांनी मुदत संपल्यानंतर तुम्ही या योजनेचे नूतनीकरण करू शकत नाही. जर तुम्हाला पुन्हा गुंतवणूक करायची असेल तर सुरू असलेल्या व्याजदराने नवीन सुरुवात करावी लागेल.
जर आपण एनएससी मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांच्या मॅच्युरिटी वर 1 लाख 44 हजार 903 रुपये तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही दहा लाख रुपये गुंतवलेले असतील तर 7.7 प्रतिशत व्याजदरानुसार 1 लाख 49 हजार 034 रुपये मिळवू शकतात. म्हणजे व्याजाचा फायदा 4 लाख 49 हजार 034 रुपये एवढा मिळू शकतो. जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागतो. त्याचबरोबर https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Form.aspx#savingcertificates या वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज तुम्ही सादर करू शकतात.












