IKEA Pune store opening : पुण्यात आइकिया कंपनीची पुण्यात ग्रँड एन्ट्री झाली आहे. या कंपनीने पुण्यात मोठी जागा भाड्याने घेतली आहे. Ikea इंडिया शहरातील शोरूम ची संख्या आणि व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नात असून 15 ऑक्टोबर रोजी या जागेचा कॉन्ट्रॅक्ट नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरात स्वीडन येथील होम फर्निचर कंपनी Ikea इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीने पहिले स्टोर उघडण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने पुण्यातील विमान नगर येथील फोनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये जागा भाड्याने घेतली आहे. ही जागा 37 हजार 259 sq ft असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. (IKEA Pune store opening)
हे हि वाचा : आता पंतप्रधान आवास योजनेतील घरे मिळणार स्वस्तात; रेडी रेकनर बाबत राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
ही स्वीडन कंपनी भारतात शोरूम ची संख्या आणि व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असून हैदराबाद नवी मुंबई आणि बेंगलोर या ठिकाणी देखील या कंपनीचे स्टोअर्स उपलब्ध आहेत. पुण्यात घेण्यात आलेल्या जागेचा कॉन्ट्रॅक्ट 15 ऑक्टोबर रोजी नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर ही जागा पाच वर्षासाठी भाडयाने घेण्यात आली आहे. या जागेचे सुरुवातीचे मासिक भाडे 38 लाख रुपये आहेत.
स्वीडन कंपनी Ikea ने चेन्नई आणि पुणे या दोन्ही शहरात विस्तार करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. तर यापूर्वी नवी दिल्ली येथील टायगर गार्डन या परिसरात असलेल्या पॅसिफिक मॉलमध्ये पंधरा हजार चौरस फुटांचे छोटे स्टोअर सुरू करण्यात आले होते. याशिवाय 2013 मध्ये भारताच्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या नियमानुसार स्टोअर उघडण्याची मंजुरी या कंपनीला मिळाली होती. आणि त्यानंतर या कंपनीने भारतीय रिटेल बाजारपेठेत प्रवेश केला होता.












