Important rule changes from December 1 : नोव्हेंबर महिना संपायला अवघे 3 दिवस बाकी आहे. प्रत्येक महिन्यात आर्थिक दृष्ट्या कोणकोणते बदल होणार आहे यावर लक्ष केंद्रित केले जाते. आता डिसेंबर महिन्यात सुद्धा काही आर्थिक बदल होणार आहेत. ज्यामुळे तुमच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. जाणून घेऊया 1 दिसेबर पासून लागू होणारे 5 नवीन नियम.
LPG Gas सिलेंडर
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी कंपन्यांकडून सिलेंडरच्या दरात होणारे बदल जाहीर केले जातात. त्यानुसार आता 1 डिसेंबरला व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आले आहे. या lpg कंपनीने नवीन दर जाहीर केले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर बदलले होते. त्यानुसार 1 नोव्हेंबरला 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 6.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. घरगुती वापराच्या गॅसच्या दरात बदल करण्यात आलेले नव्हते. आता 1 डिसेंबरला या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पेन्शन योजना
यूनिफाईड पेन्शन योजना निवडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत तारीख देण्यात आली होती. त्यानंतर या तारखेत बदल करून 30 नोव्हेंबरची तारीख निश्चित करून देण्यात आली होती. आता यामध्ये एनपीएस आणि यूपीएस यापैकी एक पर्याय निवडण्याचा पर्याय 30 नोव्हेंबर पर्यंत खुला करण्यात आला होता. परंतु 1 डिसेंबरपासून हा पर्याय निवडण्याची संधी मिळणार नसल्याची शक्यता आहे. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला एनपीएस किंवा यूपीएस पैकी एक पर्याय निवडणे बंधनकारक असणार आहे.
हे ही वाचा : सावधान ! आधारकार्ड पॅनकार्ड अपडेट केले का ? 31 डिसेंबर पर्यंत न झाल्यास पॅनकार्ड होणार inactive
लाईफ सर्टिफिकेट
30 नोव्हेंबर पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागणार आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने जर हे लाईफ सर्टिफिकेट जमा केले नाही तर पेन्शन थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टीडीएस मध्ये कपात
ऑक्टोबर महिन्यात टीडीएस मध्ये कपात करण्यात आली असल्यास सेक्शन 194-IA, 194-IB, 194M आणि 194S प्रमाणे स्टेटमेंट जमा करावे लागणार आहे. यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 1 डिसेंबर पासून हे स्टेटमेंट जमा करता येणार नसल्याची शक्यता आहे. याशिवाय सेक्शन 92E नुसार रिपोर्ट जमा करायचा असेल तर 30 नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे.
सीएनजी-पीएनजीचे दर
प्रत्येक महिन्यात तेल कंपन्यांकडून एलपीजीसह सीएनजी, पीएनजी आणि एटीएफचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्यानुसार 1 डिसेंबरला देखील सीएनजी, पीएनजी आणि जेट फ्यूएलचे दर बदलण्याची शक्यता आहे.








