Lava Agni 4 pre-launch offer : भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा ने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आता लवकरच लावा भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव असेल Lava Agni 4. 20 नोव्हेंबर रोजी भारतात लॉन्च होणार असून कंपनीने ग्राहकांसाठी लॉन्चिंगपूर्वीच जबरदस्त ऑफर आणली आहे. अशी ऑफर ग्राहकांना आता पर्यत कोणत्याच कंपनीने दिली नसेल.
Lava Agni 4 या स्मार्टफोन मध्ये प्रीमियम सेगमेंटमध्ये अनेक फीचर्स मिळणार आहे. यामध्ये MediaTek चा पावरफुल असा Diamensity 8350 चिपसेट असणार आहे. ज्यामुळे 5G कनेक्टिविटी आणि अप्रतिम गेमिंगचा अनुभव मिळेल. या स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 66 W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. याशिवाय स्मार्टफोन मध्ये LPDDR 5X रॅम UFS 4.0 स्टोरेज आणि नो ब्लोटवेअर मिळणार आहे.
हे हि वाचा : oneplus 15 launch date in india : स्मार्टफोन लॉन्चिंग नंतर कंपनीने दिली ग्राहकांना अप्रतिम डिस्काऊंट ऑफर
कॅमेरामध्ये आहे अपग्रेड
Lava Agni 4 या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेराचं बाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये 50 MP चा ड्युअल रियल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 50 MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 24 हजार ते 25 हजार पर्यँत असू शकते. हा स्मार्टफोन मार्केट मध्ये Samsung Galaxy A 26 5G सोबत स्पर्धा करू शकते.
काय आहे ऑफर (Lava Agni 4 pre-launch offer)
Demo@Home असे या ऑफरचे नाव असणार आहे. या ऑफर अंतर्गत मुंबई, दिली आणि बेंगळूर या ठिकाणी असलेल्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल खरेदी करण्यापूर्वी तो घरी घेऊन जाऊ शकतात. आणि खरेदी करण्याचा अंतिम निर्णय घेऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला Lava Agni 4 या स्मरफोनमध्ये देण्यात आलेले फीचर्स चेक करता येतील. आणि स्मार्टफोन खरेदीपूर्वी वापरता येईल.
लावा कंपनीने दिलेल्या ऑफरनुसार तुम्हाला खरेदी न करता स्मार्टफोन घरी घेऊन जायचा असेल तर तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. त्यानंतर कंपनी त्यापैकी काही ग्राहकांची निवड करून त्यांना हा स्मार्टफोन घरी पाठवेल. याशिवाय जर ग्राहकांना हा स्मार्टफोन वापरल्यावर आवडला नाही तर खरेदी करायची आवश्यकता नसल्याचे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे.









