oneplus 15 launch date in india : स्मार्टफोनच्या दुनियेत दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. अशातच सर्व मोबाईल कंपन्या इतर मोबाईल कंपन्यांसोबत स्पर्धा करत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ऑफर्स समोर ठेवत आहे. अशातच आता नुकत्याच लॉन्च झालेल्या oneplus 15 या स्मार्टफोन कंपनीने ग्राहकांसाठी नवीन ऑफर लॉन्च केली आहे.
नुकताच oneplus कंपनीने नवीन फ्लॅगशिप oneplus 15 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. या स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या कंपनीने या स्मार्टफोन मार्केटवर आकर्षक डिस्काउंट जाहीर केला आहे. आणि खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्ही सुद्धा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा साठी oneplus15 हा स्मार्टफोन फायदेशीर ठरेल.
oneplus 15 हा नवीन लॉन्च झालेला स्मार्टफोन जुन्या onplus 13 पेक्षा अप्रतिम असल्याचे सांगण्यात येत आहे. oneplus13 ची डिझाईन, परफॉर्मन्स, डिस्प्ले या तिन्ही बाबींचे अपग्रेड म्हणजे oneplus 15 आहे. या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 हा अत्याधुनिक आणि वेगवान चिपसेट उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये नवीन टेक्नॉलॉजीमुळे OnePlus 15 च्या किमतीत वाढ झाली आहे. परंतु आता कंपनीने दिलेल्या लॉन्चिंग ऑफर्समुळे ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करता येईल.
oneplus 15 या स्मार्टफोन मॉडेलची 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 72 हजार 999 एवढी असून oneplus 13 च्या तुलनेत ही किंमत 3000 रुपयांपेक्षा जास्त आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन कंपंनीने दिलेल्या ऑफर नुसार खरेदी केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
काय आहे ऑफर
जर तुम्ही Oneplus 15 स्मार्टफोन खरेदी करणार असाल आणि तुम्ही HDFC क्रेडिट कार्डधारक असाल तर तुम्हाला Oneplus 15 या स्मार्टफोनच्या खरेदीवर 4000 रुपयांचा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. या ऑफरचा फायदा घेतल्यास तुम्हाला OnePlus 15 हा स्मार्टफोन 68,999 रुपयांना मिळू शकेल. आणि जर ग्राहकाकडे हे क्रेडिट कार्ड नसेल कंपनीने एक्सचेंज बोनसचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. तुम्हाला जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 4,000 रुपयांपर्यँत बोनस मिळू शकतो. त्यानुषंगाने ग्राहक जास्तीत जास्त 4,000 रुपयांचीच थेट बचत करू शकतात.
स्मार्टफोन कंपनीने Oneplus 15 या स्मार्टफोनच्या खरेदीवर OnePlus Nord Buds 3 फ्री गिफ्ट मिळणार आहे. ज्याची किंमत 2 हजार 299 रुपये आहे. हे इयरबड्स स्टॉक उपलब्ध असे पर्यंत मोफत दिले जाणार आहे. ही ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर असणार आहे.









