Personal loan planning tips : आजकालच्या काळात अचानक एखादा खर्च उद्भवल्यास काही व्यक्ती पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. खरंतर पर्सनल लोन हे गरजेच्या वेळी आर्थिक मदतीचे प्रभावी साधन आहे. परंतु या पर्सनल लोनचे नियोजन करण्यात आले नसेल तर कर्जाच्या फेऱ्या माराव्या लागतात. आणि यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्सनल लोन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर देखील काही गोष्टींचे काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अशावेळी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून पर्सनल लोन घेतल्यावर ते फेडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि सुयोग्य व्यवस्थापन केले जाईल.
चला तर मग जाणून घेऊया पर्सनल लोन घेतल्यानंतर खर्चाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं
लोन घेण्याची खरंच गरज
तुम्ही पर्सनल लोन घेण्यापूर्वी त्याची खरंच गरज आहे का याचा शोध लावणे तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही लोन घेण्यापूर्वी स्वतःलाच हा प्रश्न विचारा आणि याचे उत्तर मिळवा. बरेचदा आपण भावनेच्या आहारी जाऊन काहीही विचार न करता लोन घेण्याचा विचार करतो. परंतु जेव्हा या पर्सनल लोनची परतफेड करण्याचा वेळ येते तेव्हा आपल्यावर आर्थिक ताण येतो. अशावेळी विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्याकडे तुमची सेविंग, एफडी किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर यामधून निधी उभारता येऊ शकतो का याचा विचार करा. तरीही तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर पर्सनल लोनच्या माध्यमातून आवश्यक तेवढीच रक्कम घेण्याकडे प्राधान्य द्या. परंतु तुम्ही भावनेच्या भरात जास्त रक्कम घेतली तर व्याज आणि परतफेडीचा कालावधी दोन्हीही वाढतो. आणि यामुळे कमी कालावधीत परतफेड करणे शक्य होत नाही आणि कर्जाचं ओझं तुमच्या डोक्यावर येऊ शकतो.
व्याजदर आणि इतर पैशांचे व्यवस्थापन करा
तुम्ही लोन घेत असलेल्या बँकेचे आणि वित्तीय संस्था यांचे व्याजदर किती आहे हे अवश्य तपासा. प्रत्येक बँकेत आणि द्वितीय संस्थांमध्ये पर्सनल लोन साठी वेगवेगळे व्याजदर लावले जातात. त्यानुसार काही ठिकाणी दहा टक्के व्याजदर तर काही ठिकाणी 16 ते 18% व्याजदर लगावण्यात येतो. याशिवाय तुम्ही फक्त व्याजदर न पाहता प्रोसेसिंगची फी , प्रीपेमेंट चार्जेस, लेट पेमेंट फी या सर्व बाबींचा देखील विचार करा. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर तुम्ही चांगला आणि योग्य निर्णय घेतलास तुमचे हजारो रुपयांचे व्याजदर वाचू शकते.
ईएमआय स्कीम आधीच तयार करा
जर तुम्ही एखाद्या बँकेकडून पर्सनल लोन घेतले, त्यानंतर तुमच्याकडे महत्त्वाचं व्यवस्थापन असतं ते म्हणजे परतफेड. यासाठी तुम्ही ईएमआय च्या माध्यमातून हे हप्ते फेडणार असाल तर त्याचेही नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा मासिक पगार आणि इतर खर्च, सेविंग या सर्वांचा विचार करून तुमच्या लोनचा हप्ता ठरवा. साधारणतः पगाराच्या 35 ते 40 पेक्षा जास्त रक्कम पर्सनल लोनच्या हप्त्यात घालवू नका. यामुळे इतर खर्चावर ताण पडू शकतो. जर तुम्ही वेळेवर हप्ते भरले तर तुमचा सिविल स्कोर देखील चांगला राहील.
क्रेडिट स्कोर आणि पात्रता तपासा
तुम्ही कोणत्याही बँकेकडून लोन घेणार असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोर हा 750 पेक्षा जास्त असेल तर कमी व्याजदरावर लोन मिळण्याची शक्यता असते. परंतु तुमचा क्रेडिट स्कोर हा कमी असेल तर बऱ्याच बँक लोन देण्यासाठी टाळाटाळ करतात. किंवा खूप व्याजदर लावतात. म्हणून कधीही पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोर नक्की तपासा. याशिवाय लोणच्या अटी सविस्तर जाणून घ्या म्हणजे पुढे चालून अडचण येणार नाही.
अनावश्यक गरजांसाठी लोन घेऊ नका
कधीही भावनेच्या भरात येऊन अनावश्यक खर्च करू नका. जसे की महागड्या वस्तू खरेदी करणे, सुट्टी एन्जॉय करणे, लक्झरी आयटम्स वर खर्च करणे यासारख्या गोष्टी टाळा. नेहमी लक्षात ठेवा की पर्सनल लोन हे बचाव करण्यासाठीचे साधन असून आनंदासाठीचं नाही. पर्सनल लोन चा वापर शिक्षण, आरोग्य, दुरुस्ती किंवा कर्ज एकत्रीकरणासाठी करू शकतात. परंतु जर अनावश्यक खर्चासाठी तुम्ही पर्सनल लोन घेतले तर तुमचे आर्थिक स्थैर्य बिघडू शकते. आणि पर्सनल लोन घेतल्यानंतर परतफेडीचा लवकरात लवकर प्रयत्न करा. (Personal loan planning tips)









