Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • रोज थोडी बचत, मोठा फायदा! पोस्ट ऑफिस योजनेत 10 वर्षांत मिळवा 15 लाखांचा फंड, कसे ते पाहा
Top News

रोज थोडी बचत, मोठा फायदा! पोस्ट ऑफिस योजनेत 10 वर्षांत मिळवा 15 लाखांचा फंड, कसे ते पाहा

Post Scheme

Post Office Savings Scheme: भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक शोधत आहात? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत रोज थोडी बचत करून तुम्ही १० वर्षात मोठा फंड तयार करू शकता. जाणून घ्या, कसा हा सोपा फॉर्म्युला तुम्हाला १५ लाखांपर्यत पोहोचवू शकतो.

भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता हवी असेल, तर नियमित बचत आणि योग्य गुंतवणूक खूप महत्वाची ठरते. पोस्ट ऑफिसची Recurring Deposit (RD) योजना यासाठी एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय आहे. या योजनेत अगदी कमी रक्कम गुंतवूनही काही वर्षात मोठा निधी तयार करता येतो.

हेही वाचा: जूनियर एनटीआर ‘ड्रैगन’ शूटिंग थांबली का? मेकर्सनी सांगितले खरे कारण

लहान रक्कम, मोठी बचत

या योजनेत तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज ३०० रुपये बाजूला ठेवले, तर महिन्याला ९००० जमा होतील, ही रक्कम RD खात्यात गुंतवली, तर कालांतराने चांगली वाढ मिळते.

व्याजदर आणि सुरक्षितता

पोस्ट ऑफिस RD वर सध्या आकर्षक व्याजदर (सुमारे ६.७ %) मिळतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, ही योजना सरकारद्वारे समर्थित असल्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.

मॅच्युरिटी आणि विस्ताराचा पर्याय

या योजनेची कालावधी साधारण ५ वर्षे असतो. मात्र, मॅच्युरिटीनंतर तुम्ही ही योजना पुढे वाढवू शकता. जास्त काळ गुंवणूक ठेवल्यास परतावा अधिक मिळतो.

आवश्यकतेवेळी मदत

जर अचानक पैशांची गरज भासली, तर RD खात्यावर कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ठराविक कालावधीनंतर तुम्ही जमा रकमेच्या काही भागावर लोन घेऊ शकता.

१० वर्षात तयार होणार फंड

दरमहा गुंतवणूक: ९०००
५ वर्षात एकूण गुंतवूणक: ५.४० लाख
जर पुढील ५ वर्ष सुरू ठेवल्यास : १०.८० लाख

आणि १० वर्षानंतर, व्याजासह एकूण रक्कम सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त होऊ शकते. यामध्ये मोठा हिस्सा हा फक्त व्याजाचा असतो, जो तुमच्या बचतीला अधिक मजबूत बनवतो.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts