स्वतःचा व्यवसाय करणं हे प्रत्येकाला आवडत असतं. पण त्यामध्ये होणारा लॉस यामुळे बरेच जण व्यवसाय करायला घाबरतात. पण जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही शेती सोबतच अजुन काही व्यवसाय करु शकतात. ज्यातून तुम्हाला बंपर कमाई होईल आणि सरकारकडून मदत देखील मिळेल. यासाठी तुम्हाला शहरात जाण्याची किंवा शेती सोडून दुसरे काम शोधण्याची गरज नाही तर शेती सोबतच तुम्ही हे तीन व्यवसाय करू शकतात. आणि या सोबतच गावातील काही शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही रोजगार मिळवून देऊ शकतात.
असे काही व्यवसाय आहे. ज्यामध्ये कमी पैसे गुंतवून जास्त नफा मिळवू शकतात. या व्यवसायांमध्ये भर म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारकडून काही योजना राबविण्यात येतात. या योजनेतून शेतकरी लोन घेऊन किंवा सबसिडी घेऊन शेती सोबतच काही व्यवसाय सुरू करू शकतात.
कोंबडी पालन, पोल्ट्री फार्म
कोंबडी आणि अंडे याकडे सर्वांची पसंती आहे. त्यामुळे हा कोंबडी पालन किंवा पोल्ट्री फार्म चा व्यवसाय प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू शकतो. आणि प्रॉफिट देखील होऊ शकतो. कोंबडी आणि अंड्यांना बाजारामध्ये भरपूर भाव आहे. वर्षभर प्रत्येक सिझन मध्ये कोंबडी आणि अंड्यांची डिमांड सुरू असते. या पोल्ट्री फार्म साठी सरकारकडून देखील मदत केली जाते. सबसिडी आणि लोन देखील या व्यवसायासाठी दिल्या जातं.
पशुपालन आणि डेअरी फार्म
बऱ्याच ठिकाणी आपण डेरी फार्म बघतो. काहींनी पूर्वीपासूनच डेअरी टाकलेली असते परंतु त्यांच्या डेअरीची पकड बऱ्याच गावांमध्ये बसलेली नसते. कारण त्यांच्या डेअरीमध्ये असलेल्या दुधाची क्वालिटी योग्य नसते. पण चांगल्या दुधाच्या कॉलिटी सह तुम्ही तुमचा स्वतःचा डेअरीचा व्यवसाय टाकून नफा कमवू शकतात. शेती करत असताना दहा-बारा गाई म्हशी पालन करून या डेअरी फार्म ची सुरुवात करू शकतात. याचबरोबर पशूंचे गोबर शेतीसाठी उपयुक्त असते. ते वापरून शेतीमध्ये देखील चांगल्या पिकासाठी फायदा होऊ शकतो.
पिठाची गिरणी
गहू दळण्यासाठी किंवा अजून धान्य दळण्यासाठी पिठाच्या गिरणीची गरज फक्त शहरातच नाही तर गावात देखील भासते. पूर्वी आपली आजी किंवा गावाकडील बाया जात्यावर पीठ दळत होत्या. पण आताच्या काळात ते शक्य नसून आज काल पिठाच्या गिरणीची गरज भासू लागलेली आहे. शेतकरी या पिठाच्या गिरणीवर डाळी, गहू दळून त्या बाजारात विकू शकतात. बऱ्याच शहरी भागात दळण दळण्यासाठी वेळ नसल्यामुळे रेडीमेड पीठाची मांग वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी हा व्यवसाय करू शकतात. याचबरोबर सरकारकडून या व्यवसायासाठी उद्यम योजना राबवण्यात येते त्यातून तुम्ही लाभ घेऊ शकतात.