Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • SBI ने ग्राहक व्यवहार शुल्कांमध्ये केली सुधारणा; IMPS ऑनलाईन व्यवहारांवर सेवा शुल्क जाहीर
बिजनेस

SBI ने ग्राहक व्यवहार शुल्कांमध्ये केली सुधारणा; IMPS ऑनलाईन व्यवहारांवर सेवा शुल्क जाहीर

SBI IMPS Transaction Charges

SBI IMPS Transaction Charges : तुमचे SBI बँकेत खाते आहे का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील मोठी सार्वजनिक बँक म्हणून ओळखली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI आता ऑनलाईन IMPS व्यवहारांवर शुल्क आकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने ग्राहक व्यवहार शुल्कांमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार बँकेने IMPS इमिजिएट पेमेंट सर्व्हिस च्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहारांसाठी सेवा शुल्क जाहीर करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम अनेक युजर्सच्या दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे. जर तुम्ही 25000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करत असाल तर हे शुल्क लागू असणार आहे. परंतु छोट्या व्यवहारांसाठी मुभा असेल.

एवढी रक्कम भरावी लागणार

IMPS च्या माध्यमातून SBI खात्यामधून ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी शुल्क आकारण्यात येत नव्हते. परंतु आता नवीन नियमानुसार ग्राहकांना IMPS च्या माध्यमातून 25000 पेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी सेवा शुल्क भरावे लागणार आहे. त्यानुसार जर तुम्ही 25000 ते 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार केल्यास तुम्हाला त्यावर 2 रुपये आणि GST अशी रक्कम भरावी लागेल. तसेच तुम्ही जर 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत व्यवहार केल्यास तुम्हाला 6 रुपये आणि GST अशी एक्सट्रा रक्कम भरावी लागणार आहे. IMPS च्या माध्यमातून पाठवलेली रक्कम तितकी जास्त असणार तितकी जास्त एक्सट्रा रक्कम भरावी लागणार आहे.

हे ही वाचाआठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 475 अंकांनी घसरला, निफ्टीही कोसळला

yono अँप्लिकेशनवरून व्यवहार केल्यास अनामत रक्कम भरण्याची गरज नाही

SBI बँकेचा हा नवीन नियम 15 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. याशिवाय जर तुम्ही YONO ऍप्लिकेशनचा वापर करून 25000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर तुम्हाला कोणतीही अनामत रक्कम भरावी लागणार नाही. या अप्लिकेशनवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. याशिवाय DSP, PMSP, ICSP, CGSP, PSP, RSP खाती, तसेच शौर्य कुटुंब पेन्शन खाते आणि SBI रिश्ते कुटुंब बचत खाते या शुल्कातुन मुक्त राहणार आहे. एवढेच नाही तर विशेष खाते श्रेणी सुधारित IMPS शुल्कातून वगळण्यात आले आहे.

इतर बँकांच्या ATM मधून पैसे काढल्यास 23 रुपये भरावे लागणार

SBI बँकेने ATM आणि ADWM शुल्क 1 डिसेंबर पासून लागू होणार आहे. त्यानुषंगाने जर तुम्ही इतर बँकांच्या ATM मधून मोफत मर्यादेपलीकडे जास्त पैसे काढल्यास 23 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आकारण्यात येणार आहे. तर पगारी खातेधारकांना दर महिन्याला 10 मोफत व्यवहार करता येणार आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts