Sensex Nifty market update: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला मोठा दबाव दिसून आला आहे. सोमवारी प्री-ओपन सत्रातच सेन्सेक्स आणि निफ्टी लाल चिन्हात सुरु झाले. जागतिक बाजाराकडून संमिश्र संकेत मिळाल्यानं गुंतवणूकदार सावध राहिले. दरम्यान एफआयआयनी रोख आणि फ्युचर्स बाजारात विक्री सुरू ठेवल्याने बाजारात अस्थिरता वाढली आहे.
आठवड्याची सुरुवात निराशाजनक :
सोमवारी बाजाराची सुरुवात अपेक्षेप्रमाणे चांगली झाली नाही. ओपनिंगनंतर काही मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीतून सावरले असले तरी घसरण कायम राहिली. बाजार उघडताच सेन्सेक्स 150 अंकांनी खाली आला तर निफ्टीमध्येही किरकोळ घसरण दिसली. सुरुवातीच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला असून बाजारावर विक्रीचा दबाव दिसून येतो आहे.
हे हि वाचा : अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेईना.. तीन हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
PSU, मेटल आणि फार्मा क्षेत्रांमध्ये तेजी :
आजच्या व्यवहारात काही क्षेत्रांमध्ये चांगली वाढ दिसली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, मेटल आणि फार्मा निर्देशांक हे तेजीत ट्रेड करताना दिसले. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी मेटल निर्देशांकात खरेदीचा ओघ वाढला आहे. याउलट निफ्टी IT आणि FMCG निर्देशांकात दबाव कायम आहे. मिड-कॅप निर्देशांक 40 ते 50 अंकांनी वाढला, तर स्मॉल-कॅप निर्देशांक 100 अंकांनी वधारला. यावरून गुंतवणूकदारांचे लक्ष आता मध्यम आणि लघु क्षेत्रातील शेअर्सकडे वळलेले दिसत आहे.
गेल्या आठवड्यातील अस्थिरतेचा बाजारावर परिणाम :
गेल्या आठवड्यात बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली होती. परदेशी गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात विक्री, मजबूत डॉलर आणि जागतिक संकेत यांचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला. तरीही सरकारी खर्चात वाढ आणि जीएसटी संकलनाच्या मजबूत आकड्यांनी बाजारातील भावनिक स्थितीला आधार दिला. अमेरिकन बाजारांनी शुक्रवारी जोरदार बंद केल्यामुळे आशियाई बाजार तेजीत दिसले, पण भारतीय बाजारात ती गती दिसून आली नाही.
गुंतवणूकदारांनी काय करावं? (Sensex Nifty market update)
तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजाराची दिशा जागतिक संकेत, डॉलर इंडेक्स आणि एफआयआयंच्या गुंतवणूक हालचालींवर अवलंबून असेल. अल्पावधीत PSU बँकिंग, मेटल आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना संधी मिळू शकते. तर IT आणि FMCG क्षेत्रात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतो.











