Smart trick to pay home loan EMI : आयुष्यात प्रत्येकाला स्वतःचं घर घेण हे स्वप्न जपावसं वाटतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा धडपडत असतो. स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी बरेच लोक हे वर्षानुवर्षे बचत करतात. बचत करून देखील घराचे बजेट हातात नसल्यामुळे होम लोन हा पर्याय समोर येतो. मग अशावेळी अनेक बँका एनबीएफसी यांच्याकडून होम लोन घेतले जाते. परंतु होम लोन घेण्यासाठीची रक्कम जास्त असल्यामुळे होम लोनचे हप्ते फेडणे जरा अवघड जाते. तुम्ही देखील होम लोनला वैतागले असाल तर जाणून घ्या होम लोन लवकर भारण्यासाठीच्या काही स्मार्ट टिप्स.
तुम्ही होम लोन घेतल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित करून दिलेला EMI भरावा लागतो. सुरुवातीला EMI भरणे सोपे जाते. परंतु जसजसे व्याजदर वाढण्यास सुरुवात होते तसतसं होम लोनचं ओझं वाटायला लागतं. EMI पेमेंट मुळे लाखो रुपये फक्त व्याजावर खर्च होतात.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन घेतात तेव्हा सुरुवातीला ईएमआय चा मोठा भाग व्याजदरात जातो आणि त्यानंतर मूळ रक्कम फारच कमी राहते म्हणूनच सुरुवातीच्या काळात कर्जाची रक्कम कमी होत नाही. आणि अतिरिक्त पैसे देण्याचा प्रयत्न केला जातो.
अतिरिक्त पैसे कर्ज फेडण्यासाठी भरू शकतात
अशावेळी तुम्हाला लवकरात लवकर होम लोन पासून मुक्त होण्याचे विचार डोक्यात येतात. त्यासाठी तुम्ही अतिरिक्त पैसे कर्ज फेडण्यासाठी भरू शकतात. जर तुम्हाला बोनस मिळाला असेल तर ते देखील तुम्ही EMI साठी भरू शकतात. म्हणजेच ईएमआय व्यतिरिक्त जास्त रक्कम जर तुम्ही भरली तर तुमचे मूळ कर्ज कमी होईल. आणि यावर लागणारे व्याजदर देखील वाचेल.
हे हि वाचा : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 270 अंकांनी वधारला
याशिवाय जर तुम्ही अतिरिक्त EMI भरला म्हणजे बारा ऐवजी तेरा ईएमआय भरले तर कर्जाचा कालावधी अनेक महिन्यांनी कमी होतो. यामुळे व्याजदरामध्ये लक्षणीय बचत होते आणि तुमचा भार देखील कमी होतो.
जर तुमच्या उत्पन्नात वाढ झाली असेल तर तुमचा EMI थोडा वाढवण्याचा विचार तुम्ही करू शकतात. यामुळे कर्जाची परतफेड जलदरीत्या होऊ शकते. आणि होम लोनवर येणारे व्याजदर देखील कमी होऊ शकते. (Smart trick to pay home loan EMI)






